Saturday, June 29, 2019







 !!!.......कथा एका जन्माची....!!!

by Sanjay kamble


     "काय हा वेडेपना आहे .. या टोपल्या घेऊन आम्ही शहरात जायच का..."
अविनाश रागातच म्हणाला तसे त्याचे सासरे केविलवाण्या स्वरात बोलू लागले..
" जावईबापु.....ही आपली परंपरा हाय.. पोर सासरी निघाली की तीला शिदोरी द्यावी लागतीया... तुम्हास्नी हे सम्द बाजारात इकतही घेता यतय पर तीच्या आईन आण भनी बाळींनी रातीला जागरण करून बनीवलया... न्हाई म्हणू नगा...."
   सास-यांचे शब्द ऐकताच अविनाश बाहेर जाऊन आपल्या आलिशान मोटारीत बसला..
प्रिया ने ही आपल्या आई वडिलांच्या पायाला स्पर्श करत गळ्यात पडून थोड मन हलक केल... आणि मोटारीत जाऊन बसली.. आज ती सासरी निघाली होती.
        डोंगराळ भाग असलेल प्रियाच माहेर एक छोटस खेड असल तरी तीच्या वडीलाना मोठा मान सन्मान होता...  शिक्षण पुर्ण झाले आणि चांगल स्थळ चालून आल. अविनाश तीच्यापेक्षा १० ते १२ वर्षानी मोठा होता.. पन घर, गाडी, बंगला खुप मोठे लोक म्हणून मोठ्या आनंदान तीच लग्न लाऊन दिल..






        जुन महीण्यातील मृगनक्षत्राचे ढग पावसाच्या सहस्त्र धारांचा वर्षाव करत होते... डोंगर द-यातून खळखळणारे छोटे छोटे झरे, हिरवीगार वनराई,  दाट ऊंच ऊंच झाडे, त्यातच डोंगरावर उतरलेला एखादा पांढराशुभ्र 'मेघ' वा-याच्या संथ झोक्यासोबत हळूहळू पुढे सरकायचा... त्या धुक्यातून वाट काढत त्यांची मोटार खाली उताराला आली, तसे एखाद्या तुडूंब भरून वहाणा-या ओढ्याजवळ उभ्या बाभळीच्या काटेरी झाडावर वा-याच्या झोक्यासोबत हेलकावे घेणारी पक्षांची गवताच्या काड्या विणुन तयार केलेली छोटी छोटी फिक्कट पिवळ्या रंगाची घरटी... आणि त्यातूनच आपले भीजलेले पंख झाडून पुन्हा भरारी घेणारे रंगीबेरंगी पक्षी... आपल्या माहेरचा नेहमी डोळ्यासमोरचा हा निसर्ग आज तीच्यासाठी परका झाला होता... माहेरच्या या आठवणी मनात साठवत तीचा प्रवास सुरू झाला....






          शहरात पोहचले तेव्हा रात्र पडू लागली होती पन पावसाचा जोर कायम होता...गजबजलेल्या शहरातून त्यांची गाडी पुढे जात होती तशी प्रिया ऊंच ऊंच इमरती पहात मनातून उमलून जायची...  थोड्या वेळात त्यांची गाडी शहराच्या गर्दीपासुन थोड दुर काही अंतरावर असलेल्या एका आलीशान बंगल्याजवळ येऊन थांबली...तसे एका वयस्कर माणुसाने त्यांच्या बंगल्याचे गेट उघडले. बंगला खुपच मोठा होता.. भव्य, आलीशान असे बंगल्याचे रुप न्याहाळती गाडीतून खाली उतरली... तोच बंगल्याच्या वरील एका खिडकीतून कोणीतरी पडदा किंचीतसा बाजुला करून किलकील्या नजरेने पहात असल्याच दिसल... त्यांच्या कडे पाहून थोडी हसली आणी अविनाश च्या मागे चालू लागली...



     अविनाश न दरवाजा चे लॉक उघडायला किल्ली काढली तशी प्रिया दचकली... तीच्या मनात एक विचार चमकुन गेला... बाहेर तर कुलूप लावले आहे, मग आत खिडकीतून  कोण पहात होत... पन त्याकडे दुर्लक्ष करत ती आत गेली... बंगला आतून खुप प्रशस्त होता.. जिन्याच्या पाय-या चढत अविनाश बोलू लागला...
" तु थकली असशील... फ्रेश हो, मी थोड बाहेर जाऊन येतो.... मग जेवायला बाहेरच जाऊ..." तीला बेडरूम दाखवून अविनाश बाहेर पडला... साहित्य तसच ठेऊन ती बेडवर तशीच आडवी झाली... प्रवासाचा खुप थकवा आला होता... डोळ बंद करताच थोडी दचकुन उठली... आणि पुन्हा तोच विचार पुन्हा मनात आला... 'कोण होत उभ त्या खिडकीत'.
आपली मान  वळवून डावीकडे पाहील तर खिडकीवर लावलेला पडदा हल्क्या हवेने बाजुला व्हायचा आणि त्यातून बाहेर कोसळणा-या पावसा सोबत वा-याने झोके घेणारी बागेतील नारळीची झाडे दिसलीत... तशी ती उठली आणि समोरच्या त्या खिडकी जवळ जात पडदा बाजुला केला .

 खिडकीवरील काचेचा दरवाजा किंचीत उघडून बाहेर पाहू लागली... दुरवर रस्त्याच्या दुतर्फा खांबावरील दिवे, त्यांच्या प्रकाशात बरसणा-या पावसाच्या धारा दिसत होत्या...
वा-याच्या झोक्याबरोबरच पावसाचे थेंब आत शीरताच तीने खिडकी बंद केली आणि मागे फिरली आणि दचकुन जागेवरच उभी राहीली... मनात तोच वीचार आला आणि मागे पाहिल ही तीच खिडकी होती जिच्या मधून तीला मघाशी कोणतरी पहात असल्याच दिसल... तशीच ती पुन्हा त्या खिडकी जवळ गेली आणि खाली पाहू लागली... तोच तीला बंगल्याच्या डाव्या बाजुला अंधुक उजेडात एक छोट नारळाच झाड दीसल.. त्या खाली कसली तरी हलचाल जाणवत होती.. प्रिया थोड निरखुन पाहू लागली तशी त्या झाडाखाली कोणीतरी आहे आणि ते एका हाताने झाडाला धरून गोल गोल फिरत असल्याच दिसल... तीला थोड विचित्र वाटल म्हणून ती हे पहाण्यासाठी आपल्या रुम मधून खाली आली. बाहेर येत तीन वाचमन ला हाक दिली...
"अहो.... काका.... "
बंगल्याच्या आवारात वाचमन ला रहाण्यासाठी बांधुन दिलेल्या छोट्या घरातून हातात छत्री आणि टॉर्च घेऊन ते धावतच आले...
" बोला मालकीन बाई..."
तशी प्रिया म्हणाली..
" त्या नारळीच्या झाडाखाली कोणीतरी आहे... जरा बघाल का....?"
तसे ते आपल्या हातातली टॉर्चचा प्रकाश पाडत पाहू लागले... प्रिया बंगल्याच्या पायरी वरच उभी राहून पहात होती... वाचमन ने सगळीकडे पाहील पन काहीच दिसल नाही...





ती तशीच आत आली आणि आपल्या रूम मधे  गेली.. बाहेर जेवायला जायच होत त्यामुळे शॉवर घेतला आणि तयार होऊन अविनाशची वाट पहात बसली... तीला वाचनाची आवड असल्याने सोबत आणलेली काही गोष्टीची पुस्तकें काढून त्यातल एक वाचत ती बेडवर आडवी झाली... आपले पाय बेडवरून खाली सोडून तीच वाचन सुरू होत... पन वाचता वाचता कधी झोप लागली तील समजलच नाही... इतक्यात आपल्या पायाच्या तळव्यावर कोणाचातरी हल्का स्पर्श होत असल्यासारख वाटू लागल... तीला हल्की जाग आली पन डोळ्यावर झापड होतीच... पुन्हा ती तशीच झोपु लागली तोच कोणीतरी आपल बोट पायाच्या तळव्यावर हळुच ओढल तशी ती एकदम जागी झाली... झटकन आपले पाय वर घेऊन उठून बसली...
.  वर घड्याळात पाहील तर दीड वाजलेला... कसला तरी भास झाला असेल अशी मनाची समजुत काढली... अविनाश अजुनही आला नव्हता... दिवसभर पोटात अन्नाचा कण नव्हता त्यामुळे तीला भुकही लागली होती... अविनाश ला फोन केला पन तो फोन उचलत नव्हता, शेवटी आईन बांधुन दिलेली भाजी भाकरी खाऊन घोटभर पाणी प्यायली आणि पुस्तक घेऊन पुन्हा वाचत बसली तोच अविनाश च्या गाडीचा आवाज आला.. तीन खिडकीतून पाहिल तर अविनाश सोबत आणखी एक माणुस होता... प्रियान आपले केस नीट केले आणि एका हातात मोबाइल घेत दुस-या हाताने आपला पदर सावरत खाली आली... ती खाली येई पर्यन्त दोन वेळ बेल वाजली होती... गडबडीत तीने दरवाजा उघडला तसा पडत झडत अविनाश आत आला.. तो खुप प्यायला होता... तो पडणार तोच प्रियाने त्याला सावरले... ती काही विचारणार तेवढ्यात सोबत आलेली व्यक्ति म्हणाली...
" मालकीनबाई ... मी तुमचा ड्राइवर 'बबन'.. त्यांना अशा अवस्थेत गाडी चालवता येणार नव्हती त्यामुळे साहेबानीच मला फोन करून बोलवुन घेतल होत..."
एवढ बोलून ड्राइवर ने तीच्या हातात गाडीची चावी दिली..आणि निघुन गेला..
       हातातील मोबाइल सोफ्यावर ठेऊन अविनाश ला पकडुन ती आपल्या बेडरूम मधे नेऊन बेडवर बसवले पन तो तीथच आडवा होत झोपी गेला...त्यान दारू पिलेली पाहून प्रियाला भयंकर संताप आला..... तीला झोप येत नव्हती म्हणून पुन्हा ते पुस्तक वाचत बेडवरच बसली... वाचता वाचता तीला झोप लागते न लागते तोच परत तीच्या पायाच्या तळव्यावरून बोट फिरवल्यासारख्या स्पर्शाने ती झटकन जागी झाली... आणि आपले पाय जवळ ओढून आजुबाजुला पाहू लागली..  या घरात आल्यापासुन तीला हा एकच भास होत होता. कदाचित आपल्या बेडखाली कोणीतरी लपुन बसले असेल या जाणीवेने ती आणखी घाबरली... थोडा वेळ तशीच बसुन काही चाहुल येते का पाहील पन सर्व काही शांत होत... मग तीन स्वता: बेडखाली काही आहे का हे पहाण्याच ठरवल पन खाली उतरण्याचा धाडस होत नव्हत म्हणून ... आपले केस वर बांधुन बोडवर पालथी झाली, खाली पाहण्यासाठी हळू हळू पुढे सरकू लागली तसे तीच्या काळजाचे ठोके वाढत होते... तीची नजर बेडखाली फिरत होती, खाली काहीच नव्हते पन दुस-या क्षणात लाईट्स गेल्या तशी ती घाबरली आणि कोणतीही हलचाल न करता बेडवर शांत पडून राहीली... दुरवरून किंचीतसा प्रकाश खिडकी मधुन येत होता... टॉर्च लावण्यासाठी मोबाइल  शोधू लागली तस लक्षात आल की मघाशी अविनाश ला वर आणताना मोबाइल खाली हॉल मधेच राहीला... तशी हतबल होऊन ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली... काही वेळ एक निरव शांतता होती पन ती जास्त वेळ राहीली नाही...  आपल्या रूम मधे कसला तरी आवाज येत असल्याच प्रियाला जाणवल...  श्वास रोखुन प्रिया तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली.. कोणीतरी आपल्या रुम मधील फर्शीवर कन्हत कन्हत आपल डोक आपटत असल्यासारख वाटू लागल...  प्रियाला हे थोड विचित्रच वाटु लागल ... तोच कोणीतरी रांगत,सरपटत फिरत असल्याच जाणवू लागल...  ही चाहुल तीच्या बेड खालुनच येत होती... अगदी तीच्या जवळ.. या आवाजान तीच्या काळजाच पाणी झाली...  भीतीने तीला घाम फुटला होत... 



     तीच्या रूम मधे भयान काळोखात, निरव शांततेत कोणीतरी असह्य वेदनेने कन्हत रांगत, सरपटत फिरत होत, ही विचीत्र चाहूल तीला प्रत्येक क्षणाला जाणवत होती... आणि ते काय असेल या विचाराने भयभीत होऊन तीचा प्राण कंठाशी आला. तीने आपले डोळे गच्च मीटून घेतले आणि अविनाशचा हात घट्ट पकडून थरथर कापू लागली... हवेत गारवा असला तरीही भीतीने तीला घाम फुटला होता...  इतक्यात तीला जाणवल की कोणीतरी आपल्या बेडवर चढण्याचा प्रयत्न करतय... आता मात्र हे तिच्या सहणशक्ति पलीकडच होत... भीतीने  काळजाचे वाढणारे ठोके तीला स्पष्ट ऐकु येत होते...  जोरात ओरडाव अस वाटल पन दुस-याच क्षणाला आपल्या एका हातानी आपल तोंड दाबुन धरल पन भीतीने तीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागल... प्रिया आता भीतीने थरथर कापत होती... थोड धाडस करून तीन आपले डोळे किंचीत उघडून  पाहू लागली तस खिडकीतून आत येणा-या थोड्या प्रकाशात तीला आपल्या बेडवर एक बुटकी,  काळी आकृति दिसली आपल्या लालसर किलकील्या नजरेने ती आकृति एकटक प्रिया कडे पहात होती... ते भीषण द्रुष्य पाहून तीच्या अंगावर सर्रर्रर्रर्रर सर्रर्रर्रर्रर्र काटा येऊ लागला... आणि दुस-याच क्षणाला त्या आकृतिच्या मागुन आणखी एक पांढरट आकृति सरकत बाजुला झाली...आता मात्र तीची सहनशक्तिच संपली.... आपल्या दोन्ही मुठी करकचुन आवळुन ती जोराने किंचाळणार तोच लाइट्स आल्या आणि त्या भयानक आकृत्या कुठेतरी नाहीशा झाल्या.. मघापासुन सुरू असलेला थरार, तो विचित्र आवाज सर्व काही शांत झाल होत...
घड्याळात पाहील तर रात्रीचे ३ वाजुन गेलेले... प्रियंका अजुनही थरथरत होती... भयभीत नजरेने ती आजुबाजूला पहात होती इतक्यात तीची नजर बेडरूमच्या दरवाजा वर गेली... दरवाजाच्या खालच्या फटीतून पलकडे कोणीतरी उभ आहे आणि हळू हळू दूर चालत जात असल्याच जाणवल... मघापासून सुरु असलेला भयानक खेळ थांबला असला तरी प्रिया च काळीज अजुनही जोरजोरात धडधडत होत... ही रात्र कधी संपेल अस तीला वाटत होत... पहाटे कधी झोप लागली समजलच नाही...


                         *****

            तीला सकाळी जाग आली तेव्हा  अविनाश आवरून office ला जाण्याची तयारी करत होता... रात्रि घडलेला प्रकार अविनाश ला सांगावा अस वाटल पन त्याच्या तापट स्वभावामुळे ती काही न बोलता उठली आणि फ्रेश व्हयला गेली... तेच बाहेरून अविनाश चा आवाज आला ..
   " मला उशीर होतोय... मी निघतो.... बाहेरच जेवण करेन..."
एवढ बोलुन तो निघून गेला... फ्रेश होऊन तीन आपल्या आई ला फोन केला...फोन तीच्या बहीनीन उचलला...
" हैलो...ताई... कशी आहेस ग...."
" वैशु...आईकडे फोन दे..."
प्रियाचा आवाज खुप जड वाटत होता...
वैशालीने पन लगेच आईकड फोन दिला तस प्रियान रात्रि घडलेला भयंकर प्रकार आईला सांगितला... ती खुपच घाबरली होती... बोलता बोलता तीच्या अंगावर शहारा यायचा..
तीच बोलन ऐकून आई लागेच गावातील देवळात गेली... देवळातील पुजा-यान सार काही ऐकल आणि गंभीर मुद्रेन देवीच्या पायाला स्पर्श करून अंगा-याची पुडी आणि लाल धागा देत म्हणाले..
    " पोरी... ज्या घरात तु मलगी दिलीस त्या घरावर मृत्युची काळी सावली दिसते ग... हे लवकरात लवकर तुझ्या पोरीला दे आणि सावध रहायला सांग... आता आईच तीच रक्षण करेल...."
        प्रियाच्या वडीलाचा तीच्यावर खुप प्रेम... पुजा-यांच बोलण ऐकताच ते आपल्या मुलीची काळजी वाटु लागली..  त्यांनी तो धागा आणि अंगारा घेतला . क्षणाचाही विलंब न करता दोघे s.t. ने लेकीच्या घरी निघाले...
          इकडे प्रियाला एवढ्या मोठ्या घरात कोंडल्यासारख होऊ लागल... पन आपले वडील येत आहेत हे समजताच तीला बर वाटल... बाहेर पावसाची उघडझाप चालुच होती... थोड्या वेळात धुण भांडी करणारी बाई आली तस तीला थोड बर वाटल.. काही जास्त न बोलता तीन आपल काम केल आणि निघुनही गेली... तशी पुन्हा तीला एकांताची भीती वाटू लागली... रात्रि घडलेल्या जागरणाने आता दिवसा तीच्या डोळ्यावर  झोपड येत होती... हॉल मधील सोफ्यावर बसल्या बसल्याच तीला डोळा लागला... आणि पुन्हा तेच घडले पन या वेळ तीला आपल्या पायाजवळ तीच काळीकुट्ट बुटकी आकृति बसल्यासारख दिसल... त्या आकृतिने जोरात आपले नख तीच्या पायाच्या तळव्यावर ओढले तशी झटकन प्रिया न आपले पाय जवळ ओढून जागी झाली... पन कोणीच नव्हत... तेच स्वप्न तीला पुन्हा दिसले तशी अस्वस्थ झाली... इतक्यात दरवाजाची बेल वाजली... आपले आई बाबा आले असतील म्हणून ती घाई घाईत दरवाजा कडे धावली... आणि खरच तीचे आई बाबा आलेले... आईला बघताच तीला भरून आल... त्यांना घेऊन प्रिया आत आली तोच तीची आई म्हणाली...
" पीयु... फर्शीवर हे लाल डाग कसले ग..."




तसे तीने खाली पाहील तर खरच लाल रंगाचे पण एकाच पायाचे ठसे उठले होते... ते पाहून तीच्या काळजाचा थरकाप उडाला...
चेह-यावर एकदम भीती दाटली.. आणि थरथरत्या आवाजात ती म्हणाली...
     " हे...हे.....हे....श....श....शक्य नाही....
मी....मी......स्वप्न पाहील होत...."
एवढ बोलुन ती खुर्चीवर बसली आणि पायाच्या तळव्याकडे पाहील तसे तीचे डोळेच पांढरे झाले... एखादी काच पायात घुसावी तसे पायात भेग पडली होती आणि एकसारख त्यातून रक्त वहात होत...
" अ....आई......म...म....मला...स्वप्न...."
तीच्या थरथरत्या ओठातून ऐवढेच शब्द निघाले आणी बेशुद्ध झाली..
        काही वेळात ती जागी झाली तेव्हा ती आपल्या बेडवर होती... पायाला पट्टी बांधलेली तर आई वडील बाजुलाच बसलेले आणि अविनाश मोबाइल वर कोणाशीतरी बोलत होता... शुद्धवर येताच ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली... अविनाश काळजीने म्हणाला...
  "कस झाल हे....स्वताला सांभाळून काम करायच ना..."
प्रियाच्या वडीलानी सोबत आणलेला देवीचा अंगारा आणी लाल धागा आपल्या लेकीला बांधू लागले तसा अविनाश रागातच म्हणाला...
    "ते आधी काढुन टाका ..या घरात असल्या खुळचट गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाहीत.." 
जावयाचे शब्द कानावर पडताच तीच्या वडिलाना भयंकर राग आला तरी स्वताला सावरत ते म्हणाले..
" जावई बापु....  तुमच्याकड सगळ काही आहे ... एक बायको मेली तर दुसरी मिळल..पन आपल्या मुलगीच काही बर वाईट झाल, तर रक्ताच पाणी करून फुलासारख मुलीला वाढवणा-या ह्या बापाच्या काळजाच काय होईल हे तुम्हाला नाही कळायच..."
सास-याच्या या उत्तरान अविनाश गप्पच झाला..
      त्यांनी धागा बांधला आणि त्या दिवशी घरीच राहीले... दुस-या दिवशी प्रियाचे आई वडील मुलीचा आणि जावयाचा निरोप घेऊन परतले...


                *****

         या घटनेला आता तीन चार महीने उलटून गेले असतील... दोघाचा संसार सुखात चालला होता... आता तीला कसलाच भास होत नव्हता आणि ती गरोदर होती...
गौरी- गणपतीच्या सणासाठी ती आता माहेरी आलेली... घरात सगळे आनंदी होते... पन ही एका भयान वादळा पुर्वीची शांतता होती...
  गौरी गणपतीच्या सणात आपल्या मैत्रीणीसोबत चार दिवस घालवून ती आज सासरी निघाली.. आईने तीला ग्रामदेवतेच्या पायावर डोक ठेऊन आशीर्वाद घ्यायला सांगितल तशी प्रिया देवळात गेली... देवीच्या पाया पडली आणि देवळातील गुरवाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला तसे गुरव शांतपने म्हणाले..
" पोरी लग्ना नंतर ज्या विचित्र घटना तुझ्या आयुष्यात घडल्या त्या मी दिलेल्या धाग्याने बंद झाल्या नाहीत ... त्या घटना पुढे तुझ्या आयुष्यात येणा-या एका भयान वादळे सुचक होते..."
प्रिया थोडी घाबरली आणि साडीचा पदर सावरत हात जोडून त्यांच्या समोर बसली...
तसे आपले डोळे बंद करून मंत्र पुटपुटत गुरवानी खाडकन डोळे उघडले आणी म्हणाले..
" तुला अशा ताकतीचा सामना करायचा आहे जीला तीन्ही लोकातील कोणताच ईश्वर  आजवर पराभुत करू शकला नाही , आणि  पराभुत करूही शकत नाही, जगातला कोणताही मांत्रिक, तांत्रीक तुला मदत करून त्या शक्तिला संपवण्याइतपत सिद्ध नाही.. या युध्दासाठी नियतीन तुझीच निवड का केली हे त्या नियतीलाच माहीती... देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे...
   आणखी एक गोष्ट ...मृत्युचा तांडव खुप आधी सुरू झालाय..."
प्रियाचा भयभीत चेहरा पाहुन गुरव पुन्हा आवाज चढवून मोठ्याने म्हणाले...
         " पोरी घाबरू नकोस...तुझ्यात हिम्मत आहे .. निसर्गाचा नियम आहे, युद्ध त्यांच्यावरच लादली जातात ज्यांच्यात लढण्याची हिम्मत असते... स्त्री ही आदिशक्ती आहे आणि त्यामुळेच या युद्धासाठी एका स्त्री ची निवड झाली..."
  प्रियाला गुरवानी सांगितलेल कोड उलगडल नव्हत पन येणा-या प्रसंगासाठी तीन आपल मन घट्ट करत पुन्हा मागे वळून देवळातील देवीच्या मुर्तीकडे पाहुन मनापासुन.आशीर्वाद मागीतला आणि सासरी निघाली...




          त्या दोघाचा संसार छान चालला होता. अविनाशचा स्वभाव तापट होता पन ती समजु घेऊ लागली... काही दिवसातच ती गुरवानी सांगितलेल सार विसरून आपल्या संसारात रमली.. तीला चौथा महीना सुरू झाला आणि एरवी तापट स्वभावाचा अविनाश देखील आता तीची काळजी घेउ लागला...
        एक दिवस ते प्रिया आणि तीच्या पोटातील बाळ सुखरूप आहे का याच चेकअप करून घरी परतले... प्रिया आनंदी असली तरी अविनाशचा चेहरा मात्र काळजीने व्यापला होता... तो प्रियाला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पन धाडस होत नव्हत... जेवण आवरून दोघे आपल्या बेडरुम मधे गेले... नवरा उदास आहे हे लक्षात येताच ती म्हणाली....
" काय झाल .... तुम्हाला बर वाटत नाहि का.."
म्हणत ती त्याच्या कपाळाला हात लावून पाहु लागली तसा अविनाशने तीचा हात आपल्या हाती घेत जड अंत:करणाने म्हणाला.
" पियु....आ....आय लव यु..."
त्याचे थरथरते शब्द ऐकताच प्रियाला थोडी काळजी वाटली..
"लव यु टू...पन काय झालं... इतके का अस्वस्थ आहात..."
"पियु.... तुला मन घट्ट कराव लागेल..."
" प्लिज... काय झाल सांगाल का..."
तसा अविनाश शांतपने सांगु लागला...
" डॉक्टरानी तुझ चेकअप करून मला आपल्या केबीन मधे बोलवल होत...त्यांनी सांगितल की आपल्या बाळाच्या ह्रदयात छिद्र आहे ... ते जन्मले तरी जास्त दिवस नाही जगणार..."
त्याचे शब्द कानावर पडताच प्रिया स्तब्ध झाली.. तीच्या डोळ्यातून अश्रु आले.. थरथरत्या आवाजात ती म्हणाली..
"हे.....हेे.....हे...खोट आहे ...माझ्या बाळाला काही झालेल नाही .. " 
तीला सावरत अविनाशने जवळ घेत म्हणाला..
  "Abortion हा एकच पर्याय डॉक्टरानी सांगितलाय...मी उद्या त्यांची वेळ घेतो..."


                      *****




             अविनाश कधीच झेपी गेला, पन तीची झोप उडाली होती.. ती ही झोपण्याचा प्रयत्न करत होती पन आपल्या मातृत्वाचे स्वप्न तुटलेले पाहून तीचे अश्रु अजुनही गालावरून ओघळत केसामधे विरून जायचे... आपल्या पोटावरू हात फिरवाना तीला आणखीनच भरून यायच... तसाच विचार करत ती झोपली पन डोळा लागतो न लागतो तोच तीच्या पायाच्या तळव्यावरून बोट ओढल्याचा भास झाला आणि झटक जागी झाली ..  खुप दिवसानी हा भास झाला होता त्यामुळे थोडी घाबरली.. काही वेळ तशीच शांत बसुन राहीली तोच कसला तरी आवाज आला. ती शांतपने श्वास रोखुन ऐकू लागली तशी एक लहान मुलगी हूंदके देत रडत असल्याच जाणवल..
अविनाशला उठवायचा प्रयत्न करावा तर तो दिवसभराच्या कामाने कंटाळला होता...  म्हणून ती स्वता:च उठून आवाजाचा वेध घेत बेडवरून खाली उतरली तोच प्रियंकाला खाली पाणी सांडल असल्याच जाणवल... तीला आश्चर्य वाटल ' पाणी इथ कोणी सांडल..' म्हणत ती चालू लागली.. आवाज बाथरूम मधून येत होता म्हणून तीन बाथरूम कडे पाहिल, आणि तीच्या काळजात चरर्रर्र कन झाल... दचकून ती जागेवरच उभी राहीली..
बाथरूममधून एक बुटकी आडीज, तीन फुट ऊंचीची काळीकुट्ट आकृति तीला वाकून पहात होती तीच्या चेह-याचा थोडाच भाग दीसत होता..केस लांब आणि पाण्याने भीजले होते. तीच्या भिजलेले केसामधून पाणी खाली फर्शीवर पडत होत.. प्रिया हळु हळु  तीच्याकडे चालू लागली तशी ती आकृति आत सरकली... स्वताला सावरत प्रिया बाथरूम चा दरवाजा उघडीन आत मधे गेली तशी तीच्या भोवतीच वातावरणच बदलू लागल...बाथरूमच्या पांढ-या फर्शीवर झाडाचा पाला पाचोळा दीसू लागला... ती भयभीत नजरेने आजुबाजूला पाहू लागली तस काळोखात तीच्या भोवती नारळीची छोटीछोटी एकसरखी झाडे दीसु लागली.. तीथच मधे रीकाम्या जागेत एक खोल खड्डा खणला होती जो पावसाच्या पाण्याने पुर्ण भरला असल्याच
दीसू लागले.. या दृष्याने प्रिया थरारली, काही समजायच्या आत पुन्हा तीला कोणीतरी हूंदके देत रडत असल्याचा आवाज येऊ लागला... ती शांतपने तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली तस तीच्या लक्षात आल की तो आवाज त्या खड्या मधल्या पाण्यातून येत होता. तीची नजर खड्या मधील पाण्यावर गेले.... झाडाचा पाला पाचोळा पडून ते पाणी काळेकुट्ट दिसत होत.. ती सावध होऊन  एकसारखी त्या पाण्यात पहात होती, इतक्यात
तीला कोणीतरी हाक दिली..





    "आई.......मला वाचव ग..."
आणि दुस-याच क्षणात त्या खड्या मधून एका मुलगीचा हात बाहेर आला... तशी प्रिया थरारली, तीचा तोल गेला पन मगे भिंत असल्याने ती सावरली आणि समोरच ते भयान दृष्य धडधडत्या काळजाने पाहु लागली...त्या घाण पाण्यातून ती मुलगी रांगत बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली .... समोरच दृष्य पाहून प्रिया बंद करून खाली बसली.. तशी पाण्यातील गाळ आणी लाल चिखलाने माखलेली ती मुलगी रांगत, सरपटत ती  उठून उभी राहिली... तीच्या केसामधे चिखल, पाणी खाली ओघळत होत... लाल रक्ताळलेल्या डोळ्यानी ती प्रिया कडे पहात म्हणाली...
" आई..."
आणि आपल्या हाताचे बोट डावीकडे दाखवत जोरात ओरडली.... तीच्या आवाजाने प्रियाच्या मेंदून झिणझीण्या आल्या. तसेच त्या मुलीने बोट केलेल्या ठिकाणी प्रिया पाहू लागली... तर समोरच एका नारळीच्या छोट्या झाडाखाली एक बाई आपल्या तीन, चार वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन झोपवण्यासाठी अंगाई म्हणत होती... प्रिया उठून चालत त्या बाईकडे जात तीच्या मांडीवर झोपलेल्या मुलीकडे पाहू लागली तस तीच्या लक्ष्यात आल की हीच ती मुलगी जी आता त्या खड्यातून बाहेर आली आणि  चिखलाने बरबटली होती... थरथरत्या नजरेन प्रिया त्या बाई कड पाहील तशी तीची दातखिळीच बसली... तीला दिसल की आपणच त्या मुलीला मांडीवर घेतलय... या भयान दृष्याने ती जोराने किंचाळली.. तसा अविनाश धावत आत आला... ती थरथर कापत होती... तीला सावरत अविनाश आत घेऊन आली... तीच सगळ ऐकुन घेत अविनाश म्हणाला..
"तुला एखाद वाईट स्वप्न पडले असेल..."
पन ती अजूनही थरथर कापत होती..


                        *****


             दुस-या दिवशी दोघेही hospital मधे गेले... तीथ नेहमीचीच गर्दी.. दोघे नंबर वाट पहात बसलेले अविनाशचा मोबाइल वाजला, फोन वर बोलत तो बाहेर गेल तस प्रिया न आपला चेकअप केलेला रिपोर्ट पाहीला पन तीला तस काहीच problem दिसला नाही... तशीच ती डॉक्टराना भेटायला केबीन मधे गेली... डॉक्टरानी जे सांगितल ते ऐकून तीच्या पायाखालची जमीनच सरकली... आपला हूंदका आवरत ती तीथून बाहेर पडली ती अविनाशला न भेटताच घरी आली... आईला फोन करायचा प्रयत्न केला पन तीचा फोन लागत नव्हता...  आपल्या रूम मधे बसुन हूंदके देत रडत होती... थोड्या वेळातच अविनाश घरी आला... त्याला पाहून ती खुपच चिडली...
"तुम्ही माझ्याशी खोट बोललात...इतका मोठा विश्वासघात....का.....? मला माहिती आहे पन मला तुमच्याकडून उत्तर हव आहे ..."
तीच बोलन ऐकून घेत अविनाश शांतपने म्हणाला....
" sorry ..मला माफ कर मी खोट बोललो तुझ्याशी... पन माझा नाईलाज होता... माझ्या आई वडिलांची हीच इच्छा होती.. पन त्या आधीच ते गेले. त्यांच्या अतृप्त आत्म्याला अजुन शांति नाही भेटलेली...माझ्यासाठी नाही पन त्यांच्यासाठी..."
अविनाशच बोलन ऐकुन ती संतापली...
" म्हणून मी माझ्या बाळाचा जीव घेऊ...नाही मी या बाळाला जन्म देणार..."
तीच बोलन मधेच थांबवतो तो म्हणाला...
" मग तुला माझ्याशी घटस्फोट घेऊन इथून कायमच जाव लागेल..."
एवढ बोलून अविनाश गाडी घेऊन office ला गेला पन त्याचे शब्द कानावर पडताच ती हादरून गेली...


                         ******



        त्या रात्रि अविनाश घरी उशीरा परतला पन तो खुप प्यायला होता... तो काही न बोलता तसाच झोपी गेला...प्रिया त्याच्या शेजारीच बसलेली... आज तीच्या पोटात अन्नाचा कणही पडला नव्हता... सगळ शांत, भकास वाटत होत... डोळे मिटून ती पडून राहीली.. बराच वेळ ती तशीच बसून होती. आपल्या विचारांमध्ये ती इतकी गुरफटून गेली होती की तीला कसलंच भान राहिल नव्हते..      तोच तीला कसलासा आवाज येत असल्याच जाणवल तशी ती साावध झाली.. आपले अश्रु स्वच्छ करून ती आवाज स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न करू लागली... कोणीतरी आपल्या रूमच्या बाहेर चालत असल्याचा भास झाला... तीन अविनाश ला उठवण्याचा प्रयत्न केला पन तो गाढ झोपेत होता... न रहावून ती उठली आणि हळुच दरवाजा उघडून बाहेर आली... बाहरचे लाइट्स बंद होते त्यामुळे तीला नीटस काही दिसत नव्हत..पन एक अस्पष्ट पांढरट आकृति पाय-या उतरुन खाली जात असल्याच जाणवल...तशी प्रियाही लाइट्स न लावता तीच्या मागे चालू लागली...इतक्यात चालताना तीचा धक्का लागून फ्लावरपॉट खाली पडला, प्रियान तो उचलुन वर ठेऊन समोर पाहील तर कोणीच नव्हत... भास झाला असेल म्हणून थोडा वेळ ती तशीच हॉल मधील सोफ्यावर डोळ बंद करून बसली, तोच तीला पुन्हा एक वेगळाच आवाज येऊ लागला...
' खंन्...खंन्.....खंन्...' अशा आवाजाने ती सावध झाली आणि उठून त्याचा वेध घेत चालू लागली... दरवाजा उघडून बाहेर आली तसा आवाज वाढू लागला... आवाज त्यांच्याच बागेतील मागील बाजुने येत होता... ती हळू हळू पुढे निघाली...इतक्यात तीला दीसु लागले की बागेतील एका अंधा-या जागेवर तीच पांढरट आकृति उभी आहे, तीच्या हाती असलेल्या हत्यारान ती जमीन खोदण्याचा प्रयत्न करतेय... प्रियाला थोडी भीती वाटली पन ते कोण आहे हे पहाण्यासाठी ती आणखी पुढे निघाली... पुढे जाता जाता ती आकृति थोडी स्पष्ट होऊ लागली...
प्रियाला दिसू लागल की पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक बाई हाती कुदळ घेऊन नारळीच्या झाडाखालची जमीन खोदण्याचा प्रयत्न करतेय... तीच्या लांबसडक केसानी तीचा चेहरा पुर्ण झाकला गेलाय... जमीनीवर प्रहार करताच तीच्या बांगड्या फुटून खाली पडायच्या...तीच्याकडे पाहून तीच्या अंगावर सर्रर्रर्रर्रर्र कन काटा आला... प्रियाची चाहूल लागताच त्या स्त्री ने जोरात हातातली कुदळ जमीनीत घुसवली आणि खाली वाकून आपली मान तीरकी करत प्रियाकडे पाहु लागली...तिच्याकडे पहताच भीतीने प्रियाचे डोळे पांढरे झाले... खाली वाकल्याने तीचे मोकळे केस तोंडावर आले होते, तीचे पांढरे कपाळ आणि डोळयांच्या रिकाम्या काळ्याकुट्ट खोबण्या पहाताच प्रिया जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली पन तीच्या तोंडातून फक्त हवाच बाहेर येत होती... तीला ओरडताही येत नव्हत...  ती स्त्री हातातली कुदळ सोडून सरळ उभी राहात वर तीच्या बंगल्याच्या त्या खिडकीकडे पाहु लागली.. तस प्रियाने ही वर पाहिल आणि तीच्या काळजाचा थरकाप उडाला...कारण तीच्या समोर उभी तशीच स्त्री, वरून तीच्या बेडरूमच्या खिडकीतून रखरखत्या नजरेने पहात होती... काय चाललय हे समजण्या पलीकडच होत...प्रिया लक्ष पुन्हा समोर उभ्या त्या बाईकडे गेले तसा तीचा अर्धा केसामधून उघडा चेहरा क्रुर आणी विद्रुप होत असल्यासारख वाटू लागल , अचानक तीचा आवाज  घोगरा झाला.  आपल्या डोळ्याच्या रीकाम्या खोबण्या आणखी मोठ्या करत ती प्रियाकडे पाहू लागली... तसा प्रियाचा प्राण कंठाशी आला... भीतीन तीचे पाय जमीनीत रूतून बसल्यासारखी ती स्तब्ध होऊन पहात होती.. हळु हळू समोर उभ्या त्या स्त्री ने आपल्या हाताचे बोट पुढे करून खुणावले.. तस प्रिया ने ही आपल्या मागे पाहील आणी भीतीने आपल काळीज छाती फोडून बाहेर आल्यासारखे धडधडू लागले... कारण तीच्या पाठीमागुन काहीच अंतरावरून एक काळीकुट्ट बुटकी आक्रती ओरडत वेगाने धावत तीच्या दिशेने येत होती. त्या भयान घोग-या आवाजाने प्रिया च डोक बधीर होऊ लागल... भयभीत नजरेने ती धावत येणा-या आकृतिकडे पहात होती...घोग-या आवाजात धावत त्या आकृतिने त्या नारळीच्या छोट्या झाडात झेप घेतली आणि अद्भुष्य झाली, तशी ती समोर उभी स्त्री हातात कुदळ घेऊन जोरजोरात रडत, ओरडत किचाळत त्या झाडाखालील जमीन खोदू लागली... समोर घडलेले हे भीषण द्रूष्य पाहून तीला भोवळ आली आणी ती तीथेच बेशुध्द झाली...




                    *****


         प्रिया शुध्दीवर आली तसा अविनाश तीच्या जवळ बसलेला आणि बाजुला उभा वयस्कर वाचमन काहीतरी बोलत होता...
" सायब... वर्षभरापुर्वी तुमचे आई वडील त्याच जागेवर hartattac न मरण पावले . तुमचा आधीचा वाचमन देखील त्याच जागेवर मरुन पडलेला दिसला..."


     तसा डोळ्यावरचा चष्मा काढतात अविनाश वैतागून  म्हणाला...
" काय म्हणायच आहे तुम्हाला..."

तसा वाचमन हात जोडून बोलू लागला...
"रागवू नका सायब.. पण मलाही वाईट अनुभव येत आहेत ... कोणीतरी पायावर बोट फिरवून गेल्यासारख, कोणीतरी रांगत, सरपटत फिरतय आहे असा भास होतोय... "
     प्रिया शांतपने त्यांच बोलन ऐकत होती..  वाचमन तीथुन गेला तसे तीने डोळे उघडले आणि आता आपन ठीक आहोत म्हणत अविनाश ला office ला  जायला सांगितले...  तो ही office ला निघुन गेला... वाचमनच्या बोलणायाचा विचार करत ती उठली आणि बाहेर आली... वाचमन बंगल्याच्या आवारातली स्वच्छता करत बसलेला... त्याच्या जवळ जात ती म्हणाली.
   "काका... कधीपसुन तुम्हाला हे विचित्र भास होत आहेत..."
तसा तो म्हणाला..
"मालकीनबाई तुमच लग्न व्हायच्या वर्ष भर आधी मी रहायला आलो.. तेव्हा पासुन कधीतरी हे भास होतात..."
प्रिया पुन्हा प्रश्न विचारला...
"आणि अविनाश चे आईवडील कसे वारले.." म्हणत ती बंगल्याच्या पायरीवर बसली...
तसे ते म्हणाले...
" ते नारळीच छोट झाड अपशकुन आहे ... सगळ्यात आधी तुमच्या सासुबाई वारल्या त्या झाडाखाली त्या मरून पडलेल्या दिसल्या...डॉक्टरानी तपासुन सांगितल की त्यांना hartattac आला होता. त्या कशाला तरी खुप घाबरल्या होत्या त्यांच्या ह्रदयाच्या शीरा आतून फुटून रक्तस्त्राव झालेला..."
प्रिया शांतपने ऐकत होती...
खाली जमीनिवर बसत वाचमन पुढे म्हणाला..
" कोणीतरी सांगितल की हे पिशाच्याच काम आहे पन साहेबानी विश्वास ठेवला नाही ... आणि त्याचा आधीचा वाचमन ही अगदी तसाच मेला...."
     त्याच बोलन ऐकत प्रिया मनात म्हणाली 'इतकी भयंकर घटना इथ घडली आणि मला कोणीच सांगितल नाही..'
आपल्या डोक्यावर बांधलेल्या कापडाने तोंड पुसत वाचमन पुढ म्हणाला...
" मालकीनबाई तुमच्या सास-यानी मोठा पुजारी आणला... खुप मोठा यज्ञ घातला त्याने... लाखाच्या वर पैसै नेले ... खुप मांत्रीक,तांत्रीक केले... सर्व काही केले त्या मांत्रीक लोकानी पन खुप बुडवले याना... प्रत्येक जन येऊण म्हणायचा... माझ्या तकतीने तो आत्मा नष्ट केला ..निश्चिंत रहा ... आणि काही दिवसातच साहेबांचे वडील ही अशाच एका भयानक मरणाने गेले.."
प्रिया आश्चर्यान त्याला विचारल...
" काका इतक्या भयानक गोष्टी घडल्या हे ऐकल असताना तरी तुम्ही इथ काम करायला तयार कसे झालात.."
त्यावर तो हसुन म्हणाला ...
" पोरी तु माझ्या लेकीसारखी ग... एकच मुलगा मला.. लगीन केल... त्यांना माझी आडचन व्हायला लागली... म्हणून त्यांनी बाहेर काढायच्या आत कुठेतरी चार घासासाठी काम करून जीव जगवायचा... कसलीच भीती नाही बघ..."
त्यांच बोलन ऐकून प्रिया शांतपने आत गेली. तीला गावच्या गुरवानी सांगितलेले शब्द आठवले...
" तुला अशा ताकतीचा सामना करायचा आहे जीला तीन्ही लोकातील कोणताच ईश्वर  आजवर पराभुत करू शकला नाही आणि  पराभुत करूही शकत नाही, जगातला कोणताही मांत्रिक, तांत्रीक तुला मदत करून त्या शक्तिला संपवण्याइतपत सिद्ध नाही.. देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे... "
काही वेळात वाचमन आत येऊन म्हणाला..
" मालकीन बाई... माझी नात लय आजारी हाय...तीला बघायला जाव लागल.."
प्रिया काही पैसे देणार तोच वाचमन म्हणाला... "पैसे आहेत मालकीनबाई...लागले तर सांगेन.."
त्याच्याकडे पहात प्रिया शंभर रुपयाची नोट देत म्हणाली...
" हे घ्या .. माझ्याकडून तीला खाऊ घेऊन द्या..."
वाचमन निघुन गेला तशी प्रिया पुन्हा आपल्या विचारात गुरफटली..
         रहस्याचा उलगडा करण्यासाठी प्रिया अविनाशची वाट पहात बसलेली...
   अविनाश नेहमीप्रमाने पिऊन रात्रि उशीरा आला... तशी प्रिया त्याला या घटना बद्दल विचारू लागली... पन पुन्हा  abortion न करण्यावरून दोघामधे खुप मोठ भांडन झालं... अविनाशच्या डोळ्यात क्रौर्य दाटल होत,  त्याने प्रिया वर हात उचलला पन प्रिया काहीच ऐकण्याच्या मनस्थितीन नव्हती... तीन स्पष्टच सांगतल...
" वाट्टेल ते झाल तरी मी या मुलीला जन्म देणारच..."
तीच बोलन ऐकून अविनाशच्या तळपायाची आग मस्तकात शिरली... तीला फरफटत एका अडगळीच्या खोलीत कोंडून घालत म्हणाला..
"मला कोणाचा नकार ऐकालची सवय नाही..."



   एवढ बोलून तो आपल्या रुम मधे येऊन दारू पित बसला...एका मागुन एक पेग पोटात ढकलत होता आणी संतापाने प्रियाला शिव्या ही हासडत होता... आता नशेन नजर अंधुक होत चालली, तोच त्याला एक पांढरी आकृति त्याच्यापासुन काही अंतरावर उभी दिसली... दारेच्या नशेतच जड जीभेने अडखळत तो बोलु म्हणाला...

"  प्रिया तु परत इथ कशी आलीस.... तु तशी ऐकणार नाहीस..."
त्याने कमरेचा बेल्ट काढत उठला तशी ती आकृति चालू लागली...तसेच बडबडत अविनाश ने तीच्या मागे चालायला सुरवात केली...ती आकृति तशीच जिन्यावरुन उतरून खाली निघाली तसा अविनाशही पडत धडपडत तीला शिवीगाळ करत चालू लागला..




         इकडे... अडगळीच्या खोलीत बंद   प्रिया, तशीच त्या रुमचे दार बडवून तीथुन बाहेर काढण्यासाठी अविनाशला विणवनी करत होती...शेवटी थकुन रडत त्या खोलीत बसली होती...तीची नजर त्या खोलीला न्याहाळू लागली.. बाजूला एक जुने लागडी कपाट, एक टेबलवरील पंखा, मोडलेल्या खुर्च्या, टेबल, एक खराब सोफा.. तीन थोड निरखुन पाहिल तर त्या सोफ्या खाली एक छोटी बाहुली पडलेली दिसली... त्या बाहुली वर लालसर डाग दिसले. तीन  पाहील तर ते कोणाच तरी सूकलेल रक्त होत... प्रियाला थोड आश्चर्य वाटल तशी ती त्या खोलीची झडती घेऊ लागली...
तोच त्या लाकडी कपाटाखाली तीला एक वही पडली असल्यासारखी वाटली..तीचा हात खाली जात नव्हता तसा तीन लाकडी खुर्चीचा पाय तुटलेला भाग उपसुन काढला आणि ती वही बाहेर काढली...ती कोणाचीतरी डायरी होती...
प्रिया न डायरी झाडली तसा एक फोटो खाली पडला त्यात एक खुपच देखणी स्त्री आणि एक छोटी मुलगी होती...
डायरीची पाने पलटत प्रिया वाचू लागली..


'आज अविनाश खुप आनंदी होते... मला दिवस गेलेत हे समजताच म्हणाले..की " 'अश्विनी'...मुलगाच हवा मला.. " मी त्यांच बोलन मनावर घेतल नाही ... ते माझी काळजी घेऊ लागलेत...'
..
प्रियाला वाचुन धक्काच बसला...
' अविनाशच आधी लग्न झालेल..' भरल्या डोळ्याने ती पाने पलटत वाचु लागली तसे एक एक गुढ उकलू लागले...
..
.
' मला आज खुप वाईट वाटल.. माझ्या बाळाच्या ह्रदयाला छिद्र आहे म्हणून रिपोर्ट आलाय, अस अविनाशने सांगितल..'
.
..
.
'ते माझ्याशी खोट बोलले.. माझ बाळ व्यावस्थीत आहे पन मुलगी आहे म्हणून अविनाश आणि त्याच्या घरच्याना ते नको झालय...पन मी तीला जन्म देणारच'
.
.
.
त्यांनी मला घराबाहेर काढली..
..
.
प्रिया एक एक पान पलटत होती तस एक एक गुढ उकलत होत.
.
       'माझ पहले बाळंतपन माहेरी झाले...पन माझ्या माहेरचे सर्वच खुप उदास आहेत .. मुलगी झाली म्हणून नाही तर मला सासरच्यानी घरातून बाहेर काढली म्हणून..'
.
.
     'इस्टेटीत वाटणी द्यावी लागेल म्हणून सासरच्यानी मला आणि माझ्या लेकीला पुन्हा घरात घेतली..पन कोणी माझ्याशी बोलत नाही.'
.
.
    'सासरच्यानी तीच नाव 'नकुशा' ठेवलय कारण ती यांना नकोशी झाली आहे '
.
.
      'घरातील नोकराना काढून टाकलय मलाच सर्व कामे करावी लागतात... आज माझी मुलगी भुकेने व्याकुळ होऊन रडत होती, पन त्यानी मला तीला दुधही पाजु दिल नाही '...
.
. ' आज नकुशाचा पहीला वाढदिवस, पन साजरा करण खुप लांबची गोष्ट ..तीला तीच्या बाबाने किंवा आजी आजोबाने साध wish ही केल नाही ....'
प्रिया तशीच पान पलटत राहीली.
' आज माझ्या मुलीच्या तोंडतून पहिला शब्द बाहेर पडला आणि तो ही 'बाबा'...'

' माझी मुलगी तीन वर्षाची झाली आणी मला पुन्हा दिवस गेलेत..."
.
' आज अविनाशन दुपारी नकुशाला खुप मारल.. ते घरी बेडवर आराम करत होते.. आणि नकुशान गमतीन पायाच्या तळव्यावर बोट फिरवून पळून गेली...त्याना खूप राग आला... रागाच्या भरात त्यानी माझ्या पोरीला जनावरासारख मारल. माझ बाळ,रडत रडत माझ्या मांडीवरच झेपल..  '
.


"आज तीचा तीसरा वाढदिवस पन तीची तब्बेत बरी नाही... तीच अंग कालपासुन तापाने भाजतय.. पन कोणालाच तीची पर्वा नाही ... बाहेर जोराचा पाऊस पडतोय... डॉक्टरांचा फोन लागत नाही...तापाने ती झोपेत जाबडत आपल्या बाबांचीच आठवण काढतेय,  तीच्या डोळ्यातून अश्रु येत आहेत.."


वाचता वाचता प्रियाचेही डोळे पाणावले...

" आज तीन दिवस नकूशाच्या अंगात ताप आहे.. अविनाश घरी येताच त्याला बोलले पन मी abortion साठी नकार दिल्याने त्याने मला चमड्याच्या बेल्टने खुप मारले... त्या आवाजाने नकुशा जागी झाली आणि रडतच माझ्या आडवी आली, आणी त्याच्या समोर हात जोडून उभी राहात म्हणाली.. ' बाबा.. आईला मालू नका हो.."..पन त्याने तीला जोरात धक्का दीला तशी ती बेडच्या
कोप-यावर आपटली तीच्या डोक्यावर खोल जखम झाली.... खुप रक्त येत होत... ती तशीच उठली आणि आपल्या आजी आजोबांना बोलवण्यासाठी धावत बाहेर गेली पन तीचा पाय घसरला आणी जीन्याच्या पाय-यावरुन खाली पडली... तीचे आजी आजोबा समोर होते पण कोणीच तीला उचलल नाही....तीचा हात फ्रॉक्चर झालाय...."
प्रियाला त्या पानावर अश्रुचे सुकलेले व्रण दिसले...तीने ते पान पलटले
" नकुशाच्या डोळ्यातून एकसारख पाणी येतय..तीच अंग तापान भाजतय.. डोक्यातही खोल जखम झालीये. त्यावर साडीचा पदर फाडून बांधलाय... पन तीच्या मोडलेल्या हाताला खुप वेदना होत आहेत... ती माझ्या मांडीवर डोक ठेऊन हूंदके देतेय. पन कस सांगु तीला की तीच्या वेदना पाहून माझ काळीज फाटत होत.... माझ्या डोळ्यातली पाणी बघताच रडत रडत  आपल्या बोबड्या शब्दात मला म्हणाली...

'आई तू कशाला ललतेस ग..' एवढ बोलून नकुशा उठली आणि माझ्या पाठवर उठलेले वळ पहात त्यावरून आपला एक हात फिरवत म्हणाली
' आई तुला पन खुप दुखतय का ग.' तीच्या बोबड्या शब्दाने काळीज आणखीनच तुटतय. काय करू देवा...'
वाचता वाचता प्रियाच्या डोळ्यातून अश्रु आले.. तीने आणखी एक पान पलटले..
' मी आज नाईलाजान abortion करायला गेले होते... करण त्या बदल्यात ते माझ्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन जाणार म्हणालेत...घरी यायला रात्र झाली ... पन घरी परत असताना बागेच्या आवारात एक मोठा खड्डा खणलेला दिसला..'
         मला पुन्हा त्या अडगळीच्या खोलीत ठेवल.. आत गेले तसे वेदनेन 'आई...ग आई..ग' म्हणत कळवळणा-या नकुशाचा आवाज आला... मला पहाताच तीला आणखीच हूंदका आला... ती खाली रडत बसलेली... आपला मोडलेला हात किंचीत पुढे करत केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात म्हणाली.
"आई ...खुप दुखतय ग..."




तीचे पाणावलेले डोळे पाहून गहीवरून आल..तीला जवळ घेत मी पाहील तर तीचा हात सुजून काळा निळा पडू लागला होता... तीन वर्षाच्या माझ्या मुलीच्या इवल्याश्या जीवाला किती ह्या यातना... आज पहील्यांदा वाटल की का जन्म दिला असेल तीला...तीची अवस्था पाहून हूंदका आवर कठिन झाल होत... मी मदती साठी जोरजोरात दरवाजा वाजवून अविनाशला बोलवू लागले... तो गाढ झोपेतून उठून आला...खुप राग आला होता त्याला... मी त्याच्या पायावर डोक ठेऊन नकुशाला दवाखान्यात नेण्यासाठी विणवनी करु लागले.. पन त्याने मला पुन्हा बेदम मारला.. माझ ओरडन बंद करण्यासाठी माझे हात पाय बांधुन तोंडावर पट्टी बांधली, माझ ओरडन शांत झाल तसा तो नकुशाकडे वळला...'
प्रियाने आपल्या डोळ्यात आलेले अश्रु स्वच्छ करत पान उलटले... हे पान सुकलेल्या अश्रुनी जड झाले होते... कदाचित आपल्या काळजातील एक एक शब्द जसा च्या तसा तीन उतरवला होता..
तो नकुशा जवळ गेला.. तशी माझी मुलगी त्याचा एक हात पकडून हूंदके देत त्याला म्हणाली...

"बाबा... ओ बाबा आईला शोला हो... मला डॉक्टल अंकल कले नका नेऊ पन आईला शोला... माझा हात आता बला झाला.. माझा हात आता नाही दुखत.....'
नकुशाच बोलन ऐकत तो खाली बसत म्हणाला...
'आता हात नाही दुखत'
अस म्हणत त्याने नकुशाचा मोडलेला हात आपल्या हातात घेत जोरात दाबला.. तशी माझी मुलगी जीवाच्या आकांताने कळवळली... ढसाढसा रडता रडता केविलवाण्या नजरेने आपल्या बाबाकडे पहात ती बोबड्या शब्दात म्हणाली...' बाबा ओ बाबा... तस कलू नका हो.. खुप दुखतय ... मी पलत कदी कदी तुम्हाला त्लाश देणाल नाही..." तीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रु तीच्या इवलाशा जीवाला होणा-या यातना सांगत होते..
प्रियाला हूंदका आवरण कठिन झाल आपले अश्रु पुसत ती पुन्हा वाचु लागली..
अविनाशने तीचा मोडलेला हात आणखी जोरात दाबला तसे नकुशाने विव्हळत भरलेल्या नजरेने माझ्याकडे पहात मला म्हणाली...' आई.... तु तली शांग की ग बाबाना...खुप दुखतोय ग माझा हात...'




तीच्या डोळ्यातल्या यातना पहावत नव्हत्या..  मी ही रडत होते माझे हातपाय बांधल्याने उठताही येत नव्हत.. माझ डोक मी जमीनीवर आपटत त्याच्या कडे नकुशाच्या जिवाची भीक मागत होते... पन कुणाच्याच काळजाला पाझर फुटत नव्हता... तशीच रांगत,सरपटत तीच्याकडे जाऊ लागले...
    नकुशा अविनाशच्या गालावर आपला दुसरा हात प्रेमान फिरवत म्हणाली..
" बाबा... माझ काय चुकल हो.... मी पलत तुमच्या पायाला गुदगूल्या नाही कलनाल....."
      तीच बोलन ऐकताच अविनाश म्हणाला..
" तुझ चुकल या घरात मुलगी म्हणून जन्माला आलीस हे... माझ्या आई बाबाना वंश चालवायला मुलगा हवा होता..."
एवढ बोलुन त्याने माझ्या नकुशाचा मोडलेला हात पकडून खसकन जवळ ओढली ... एखाद्या गाईच वासरू जिवाच्या आकांतान जोरात हंबरावे तशी नकुशा ओरडू लागली... तीचा टाहो ऐकुन काळीजच फाटल...  तोच तीला खाली जमीनी वर पाडले... आपल्या दुस-या हाताने तीच नाक आणी तोंड दाबुन धरल .. ती टाचा घासत होती, तडफडत होती... तीच्या शरीराला होणा-या यातना पाहुन मी ही तडफडत होते.. माझी लेक गुदमरून टाचा घासत होती तस माझ्या काळीजाच्या चिंधड्या होऊ लागल्या...  पन त्याला दया आली नाही.. मी सरपटत येऊ लागले पन तोवर तीचा धडपड शांत झाली.. इवलासा जीव तीच्या देहातून निघून गेला होता... मी तशीच नकुशाच्या निष्प्राण देहाकडे भरल्या डोळ्यांनी पहात होते... अविनाश निघून गेला... पन  माझ्या लेकीच्या देहापुढ आपल डोक आपटत होते... तशीच सरपटत पुढ आले आणि तीच्या छातीवर डोक ठेऊन रडू लगले...
तीला आता वेदना होत नव्हत्या... तीचे डोळ उघडेच होते... अस वाटत होत की झटकन उठून धावत माझ्या कुशीत शिरेल... पन ती आता कधीच उठणार नव्हती...
    खाली जमीनीवर पडलेल तीच प्रेत पाहाताना तीच तीचा एक एक शब्द आठवत होता...
" आई... आपल्या घलात कोणीच का माझ्याशी बोलत नाही... एक दिवश मी पन कोनाशीच बोलनाल नाही..."
ती आता कोणाशीच बोलणार नाही, अगदी तीच्यावर जिवापाड प्रेम करणा-या आईशी पन..
.
.
. माझे हात कसेबसे सोडवून मी ही डायरी लिहीतेय...तीच प्रेत माझ्या मांडीवरच आहे...  माझ्या मुलीचा खुन त्यानी माझ्या समोर केलाय त्यामुळे ते मला जीवंत सोडणार नाहीत ... पन ही डायरी त्याला फासावर चढवेल..
या नंतरची सर्व पाने रिकामी होती...
अविनाशच हे भयंकर रूप प्रियंकासमोर आल तशी ती खुप चिडली... अचानक त्या डायरीच्या रिकाम्या पानावर काही शब्द उमटू लागले... प्रिया निरखुन पाहात वाचू  लागली...
' माझाही गळा बेल्टने आवळून अविनाश ने  मला ठार केल...घरच्या वाचमन आणि अविनाशने आम्हा दोघीच प्रेत बागेतील त्या खड्यात पुरून त्यावर नारळीच झाड लावल.. आमची शरीर संपली पन आत्मे या घरात तसेच फिरत आहेत... माझी नकुशा आता तुझ्या पोटी जन्म घेतेय. मी माझ्या लेकीसाठी खुप तळमळले... आता ती जन्म घेईल आणि माझा आत्मा मुक्त होईल... पन मी नेहमी तीच्या सोबत असेन तीला प्रत्येक संकटातून वाचवायला ....'
उमटलेले ते शब्द पुन्हा नाहीसे झाले... वाचता वाचता पहाटे तीला डोळा लागला..
            कसल्याशा आवाजाने प्रियाला जाग आली... सकाळ झाली होती. बाहेर पोलीस होते.. त्यानी प्रियाला बाहेर आणून बसवत म्हणाले...
" माफ करा madam पन काही प्रश्न विचारावे लागतील.. तुम्ही त्याना ओळखु शकाल..."
ते काय बोलत आहेत तीला काही समजत नव्हत...तोच एक लेडी काँन्स्टेबल म्हणाली...
" madam..त्यांचे चेहरे झाकले होते का.."
    प्रिया प्रत्येकाकडे आश्चर्याच्या मुद्रेने पाहात होती...काय बोलाव तीला सुचत नव्हत.. तोच ती लेडी काँन्स्टेबल सब इन्स्पेक्टर ना म्हणाली..
" सर त्या शॉक झाल्या आहेत ... ही केस खुपच काँम्प्लिकेटेड आहे मागिल दिड वर्षापुर्वी याच बंगल्यातील बाई आणि तीची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती... ती वेडी होती अशी कम्प्लेन्ट तिच्या सास-याने दिली होती त्या नंतर वर्षभरात याच बंगल्यात तीन खुन झालेत आणि हा चौथा....
तोच बाजुला उभा दुसरा काँन्स्टेबल साहेबांच्या कानापाशी जात हळुच म्हणाला..
" साहेब.. मला तर वाटते की हे खंडणी साठी झाल असाव.."
त्याच बोलन ऐकून इन्स्पेक्टर साहेब हळुच त्या काॅन्स्टेबलच्या कानात म्हणाले ....
" जी गोष्ट आपल्या जवळ नाही त्यावर ताण कशाला देत.."
त्यावर तो काँन्स्टेबल म्हणाला
" अगदी बरोबर बोलताय सर.. पन तुम्ही कशाबद्दल बोलताय...."
त्यावर त्याच्या थोड जवळ जात इन्स्पेक्टर म्हणाले..
" मी तुमच्या बुद्धि बाबात बोलतोय... कारण ..जर खंडणी साठीच खुन झालेत तर मग इथल्या जुन्या वाॅचमनला मारायची काय गरज होती..."
          काय झालय हे प्रिया पहायला बाहेर गेली तर त्या नारळीच्या झाडाखाली अविनाशचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह पडला होता...
      त्याच्या कडे पहाताच प्रिया गावच्या गुरवानी सांगितलेले कोडे उकलले...
    'जगातला कोणताही मांत्रिक, तांत्रीक त्या शक्तिला संपवण्याइतपत सिद्ध नाही..'
      करण आई इतके शक्तीशाली जगात कोणीच नाही...
     प्रियाच्या चेह-यावर एक समाधान होत... एका राक्षसाचा अंत झाला, आणि तीच्या मुलीला आता जन्म घेण्यापासुन रोखणार कोणीच नव्हत...
तीचा जन्म विधीलीखीत होता..... जो कुण्या राक्षसाच्या मर्जीन थांबणारा नव्हता...
!!!......समाप्त.....!!!

Save the girl child

Monday, June 10, 2019

❤...प्रपोज.....💔 Part 2



❤...प्रपोज.....💔
 Part 2

    by sanjay kamble

रात्री त्यांच्या घरी पोहोचलो.. दहा वाजले होते, सर्व जेवण आवरून गप्पा मारत बसले होत.. हाॅलमधे सोफ्यावर ती आणी तीचा भाऊ टीवी पहात होते, तर वडील बाजच्या खुर्चीवर सकाळच वर्तमान पत्र चाळत होते...
मला समोर पहाताच टीवीचा रिमोट भावाकड देत प्रिया काहीतरी निमीत्त काढुन आपल्या रुममधे गेली... माझ्या 'प्रपोजचा परिणाम, राग शेवटी. जास्त काही न बोलता थेट मुद्द्याला हात घातला.
" आई .... एक विचारू का...?"
" हो विचार ना...."
मी काय विचारतोय हे सर्वच कुतूहलाने पाहु लागले.. 
" आई इतके मोठमोठे डॉक्टर पुण्या मुंबईत आहेत मग तुम्ही कोल्हापुरला कसे आलात...? कारण इकडे 'निदान' नाही झाल तर इथले लोक त्या मोठ्या शहरात जातात...."
माझ्या प्रश्नाने सर्वच स्तब्ध झाले... तीचा भावाने टीवीचा आवाज कमी करत माझ्याकडे पाहु लागला, सर्वांचा उडालेला गोंधळ मला त्यांच्या चेह-यावरून दिसत होत...
कोणी काहीच समजु देत नव्हत. कदाचीत त्यांना ही गोष्ट कुणाला सांगावी वाटत नव्हती... 
" मला त्याची चाहुल जाणवली, ते जे कोणी प्रियाला त्रास देतय ते आहे..."
माझ्या या वाक्यान सर्वांच्याच चेह-यावर एक भीती झळकली. भिंतीकडेला उभी तीची आई मागे तोल गेल्यासारखी भींतीचा आधार घेत खाली बसली, वडीलांनी हातातल वर्तमानपत्र समोर टेबलवर ठेवत अस्वस्थपने माझ्याकडे पाहु लागले...मला पाहुन आपल्या रूममधे गेलेली प्रिया दरवाजा उघडुन बाहेर आली.. 
" काय पाहीलस तु...?"
प्रिया रागात आणी कुतूहलान विचारू लागली पन तीच्याही चेह-यावर भीती होतीच.
" एक विचीत्र आकृति. जी तुझ्या या अवस्थेला , वेदनांना कारणीभुत आहे....."
माझ बोलण ऐकताच प्रियान आपल्या आई बाबांकडे पाहील...
"आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर...." तीच्या डोळ्यात पाणी आल आणी बोलता बोलता रडत आपल्या आईजवळ बसली..
" तुम्ही सगळे मला वेड ठरवत होतात. पन मी खरच सांगतेय मी वेडी नाही हो.... 'ते' आहे ..."
" काहीतरी बरळु नकोस..." बाबानी प्रियावर ओरडत माझ्याकड पाहील....
" काय पाहीलस... ? काय दिसल तुला..? प्रिया तुच सांगितल असशील याला...!"
" नाही.... तीने काही नाही सांगीतल आणी मी तेच समजुन घ्यायला आलोय...." 
मी तीच्या बाबांना पहात म्हणालो....
" जेव्हा जेव्हा प्रियाला त्रास झालाय तेव्हा एक काळी सावली तीच्या आजुबाजूला होती.. याचा अर्थ ती फक्त प्रियालाच यातना देतेय...पन परवा त्या आकृतिन माझ्यावरही हल्ला केला.. प्रियाला तडफडताना पाहुन एक विलक्षण आनंद त्या आकृतिला होत असल्यासारख वाटत...."
सर्वच माझ्या बोलण्यान आवक झाले काही वेळ एक सर्वच गप्प होते.. अधुनमधून प्रियाच मुसमूसन तेवढच सुरू होत बाहेर रात्र गडद्द होत चाललेली आणी समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाचे टीक टीक करणारे काटे संथ गतीने पुढ सरकत होते...
" कदाचीत तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या खाजगी आयुष्यात जास्तच रस घेतोय , पन प्रियाच्या वेदना पहावत नाहीत, रस्त्यात एखाद्या अनोळखी व्यक्तिचा अपघात झाला तरी पुढ जाऊन मदत करतो मग प्रिया तर ....." मी मागे दरवाजा कडे वळलो तसा मागुन आवाज आला...
" प्लीज थांब...." तीचा आवाज येताच मी मागे पाहील.. ती आपल्या आई बाबांकडे पहात बोलु लागली...
" आजवर सगळ्यांनी मला वेड ठरवल, हायएज्युकेटेड होते ना... 'हैल्युसिनेशन' ..... हो हाच आजार झालाय म्हणाले होते ना तुमचे मोठे भाऊ... आणी मला कोल्हापुरला उपचारासाठी नव्हे तर मिरजच्या मेंटल हॉस्पीटल मधे भरती करायला आलो आहोत ना आपन....? हो ना ग आई...."
बोलताना तीला भरुन आल होत....

                          *****

मी घरी परतलो... ती थोड का असेना बोलली माझ्यासाेबत. लाईट बंद करत अंथरूणावर पडलो तोच व्हॉट्सअॅपवर मेसेज आला, प्रियाचा..
' उद्या मी तुला सांगेन सगळ , क्लास सुटल्यावर भेटू...'
तीचा मेसेज वाचुन थोड बर वाटल निदान ती या निमीत्ताने तर दोन शब्द बोलेल ...


                       *****

मी ड्युटीवर तब्बेत बरी नसल्याच सांगून बाहेर पडलो ... तीची वाट पहात ठरलेल्या ठिकाणी बसुन होतो... तोच तलाव, 'प्रपोज' वाला... हम्म.... निसर्गाने जमिनीवर हिरव्यागार गवताचा जणु गालीचा अंथरला होता, त्यावर ठरावीक अंतरावर बसलेली प्रेमी युगूल कुणालाही हेवा वाटावी अशीच ... एकमेकांच्या हातात हात गुंफून चालणारे जोडपे... आयुष्यातली सर्वात मोठी श्रीमंती त्याच्याकडे होती, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या रूपातच... त्यांना पाहुन आपन कीती कमनशिबी आहोत याची जाणिव मात्र होत होती...
"संजु......? कधीपासुन तुला बोलावतेय मी."
पाठीमागुन आलेल्या प्रियाच्या आवाजान अचानक त्या सुंदर कल्पनेतून बाहेर आलो.. समोर दूरवर गोलाकार पसरलेल्या त्या तलावामधील त्या निळसर पाण्याकडे पहातच म्हणालो
" सॉरी... जरा वेगळ्याच विचारात होतो... " बोलतच तीच्याकड पाहील .पन मागे कोणीच नव्हत , ती आली नव्हती. पन माझ्या जवळुन जाणा-या प्रेमी युगूलान विचीत्र नजरेन माझ्याकड पाहील आणी तसेच चालत पुढ गेले. पन ती अजुन कशी आली नव्हती...? 11 ला भेटणार होती 12 वाजुन गेले होते... मी तीला कॉल लावला पन नॉट रिचेबल... आणखी थोडा वेळ वाट पाहीली पन शेवटी निराश मनान घरी परतलो...येताना तीच्या घरासमोरूनच आलो पन दार बंद होतं... सरळ घरी येत बाईक स्टँडवर लावून तीला काॅल करतच आत आलो, पन अजुनही तीचा कॉल लागत नव्हता...

" प्रियाला कॉल करतोयस ना..?" माझ्या अस्वस्थ चेह-यातड पहात पुजा न विचारल
" हो ग..... काहातरी महत्वाच बोलायच आहे म्हणाली होती..."
" हे घे...." माझ्याकडे एक कागद देत म्हणाली
" तीला उपचारासाठी दुस-या हॉस्पिटल मधे नेलय... कदाचीत ते पुन्हा आपल्या गावी नाशीकला गेलेत..."
" काय...? पन मला का नाही बोलली...."
" ती सकाळी क्लासला जात होती तेव्हाच एक व्हाईट व्हॅन आली होती सगळेच सोबत गेलेत.."
मी चिठ्ठी उघडुन वाचु लागलो..
' सगळ्यांनी मला वेड ठरवल आणी एकवेळ मला स्वता:लाही वाटल की खरच मी वेडी आहे पन मी वेडी नाही रे.. निदान तु तरी माझ्या विश्वास ठेवलास thank you....'
ती चीठ्टी वाचली आणी सुन्न झालो नकळत डोळ्यात पाणी आल पन आता पुढ काय....?
ती परत तीच्या गावी गेलीय, आपली सारी दुख: , सा-या यातना एक भयान पोखरत जाणार आयुष्य घेऊन ती गेली... मला एकटच सोडुन गेली ती.... पन तीला जे सांगायच होत ते चिठ्ठीत लिहू शकत होती आणी चिठ्ठी लिहीण्यापेक्षा मेसेज करू शकत होती...
बरोबर.... कारण ती मला परका समजत होती... 'आपल्यामुळे दुस-याला त्रास नको'... हेच म्हणाली होती ना... तसाच आपल्या रुममधे जाऊन बसलो पन लक्ष लागेना. समोर काचेच्या कपाटात एका ग्रिटींगमधे पीन लाऊन उभा केलेला तो गुलाब दिसला... 'प्रपोज' वाला गुलाब. त्याच्यावरच तेज , सुगंध , त्याच सौंदर्य कमी होत चाललेल... तो पुन्हा ताजा , टवटवीत नाही होणार.... आणी शेवटी तो नकळत बाहेर फेकला जाणार , जशी प्रिया आता वेड्याच्या हॉस्पीटल मधे....
'वेड्यांच हॉस्पीटल' .......? झटकन ऊभा राहीलो
हो ती म्हणाली होती घरचे सर्व तीला मेंटल हॉस्पीटल मधे भरती करायला आलेत.. आणी तो डॉक्टरही तेच म्हणाला होता...
तो डॉक्टर......?
भेटायलाच हव......

                          *****




"नमस्कार...... आत येऊ का.....?" मी केबिनच दार उघडत विचारल...
" हो.... या ना.... बसा..." मला आत बोलवल आणी आपल्या हातातले रिपोर्ट पाहू लागले... अगदीच छान एसी केबीन होती.. समोर टेबलवरच्या जाड आणी रूद काचेवर हाथ ठेवत माझी नजर डॉक्टरांच्या खुर्चीमागच्या शरीररचनेच्या आकृतिवर स्थिरावली... काय काय साहीत्या फिटींग करतो परमेश्वर...
" बोल.... काय मदत करू तुझी....? " रिपोर्ट खाली ठेवत म्हणाले
"मला ओळखल असेल तुम्ही...?" त्यानी किंचीत भुवया आकसुन पाहल आणी डोळ्यांवरचा चश्मा काढत टेबलवर ठेवला....
"हो..... ओळखल.....त्या वेड्या मुलीचा मित्र ना..."
" तीला वेडी कशावरून ठरवलत....?"
" तीला मरणयातना होतात... अंग जळाल्यासारख्या वेदनेन ती तडफडते... पन तीच्या सर्व चाचण्या केल्या .. सर्व नॉर्मल..."
" म्हणजे तुम्ही एखाद्या आजाराच निदान करू शकला नाहीत तर तो पेशंट वेडा ठरतो.... असच ना..."
"एकदा तीनं एका कर्मचा-यावर हल्ला केला होत... आणी स्वता:च्या भावावरही.. अशा पेशंटची जागा मेंटल हॉस्पीटलच असते..."
" पन हे तीच्याकडून कोणीतरी करवून घेत असेल तर..?"
" तुला काय म्हणायच आहे....?" ते जरा रागातच म्हणाले..
" ती वेडी नाही.... ती जे भोगतेय ते दिसत नाही पन तीला त्या वेदना होतात... आणी ते खर आहे...."
" ओह..... म्हणजे भुत...? लुक मिस्टर ...?"
" संजय...."
" हा संजय.... या फालतु गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही..... मेडीकल सायंन्स किती प्रगत झालय आणी तुम्ही आजची पिढी या मुर्ख गोष्टींवर विश्वास ठेवताय..."
" सर.... तुमच्या मागे जे शरीराच्या आतल्या रचनेच मॉडेल लावलय.... कधी त्याला नीट पाहीलय..."
" हो अगदी व्यवस्थीत...... त्यातच टॉप केलाय...."
"मला सांगा... किडनी कुठ असते....? हार्ट.....? लिव्हर.......? नेक बोन....? ब्रेन......?"
डॉक्टर एकाएका प्रश्नाच उत्तर देऊन भयंकर संतापले....
" संजय...... नेमक काय म्हणायच आहे तुला....?"
" सर तुम्ही संपुर्ण शरिराचा अभ्यास केलाय पन मग याच शरिराला उभ करणारा आत्मा नेमका कुठ असतो हे सांगु शकाल...? खुपसारे कृत्रिम अवयव मेडिकल सायंन्स ने तयार केलेत पन तुम्ही कृत्रीम आत्मा तयार करू शकाल जो माणुस मेल्यानंतर त्याच्या शरिरात घातल्यावर तो पुन्हा जिवंत होईल...?"
डॉक्टर आवक होऊन माझ्याकड पहात होते....
" आणी हो.. सर...! प्रिया वेडी नाही..."
माझ्याकड पहात त्यानी एक कार्ड काचेच्या टेबलवरून पुढ सरकवल.... मी ते कार्ड उचलुन पाहात वरच्या खिशात घातल..
" Im Sorry sir... जर तुम्हाला राग आला असेल तर..."
एवढ बोलुन मी बाहेर पडु लागलो ते मात्र विचार करत त्या शरीररचनेच्या आकृतिकड पहात राहीले....



                             *****


कार्ड वर एक पत्ता आणी नंबर दिलेला... मी तो नंबर डायल केला तशी समोरून एका महीलेचा आवाज आला... मी विचारलेली माहीत त्यांनी सांगितली . मला रात्र अशीच वाया घालवायची नव्हती. घरी परतलो आणी किरकोळ साहीत्या बैगेत भरल...
"पुजा... बाहेरगावी जातोय.... उद्या येईन..."
ते मिरज च्या हॉस्पिटलमधे नव्हते गेले... कोल्हापुरजवळच एक मोठे मानसोपचार तज्ञ होते... गाडी त्या दिशेने धावत होती तशी रात्रही आणखी गडद्द होत असल्यासारख वाटु लागल... थंडीच्या दिवसात नितळ चांदण ओढुन येणारी रात्र आज कोळोखान माखली होती जणु काळ्याकुट्ट अजगरासारख्या सावल्या त्या आकाशातील चांदण्या गिळंकृत करत पुढ सरकत होत्या...





रात्रीचा गार वारा अंगाला झोंबत होता, पन वेग कमी करून चालणार नव्हत.. प्रत्येक क्षणाला मनावर एखाद दडपन होत कदाचीत मी या सर्वातुन दुर रहाव असा अप्रत्यक्ष संकेतच येत होता... रात्र बरीच झालेली साधारण आकरा वाजलेले, ते हॉस्पीटल समोर दिसत होत अगदी मणुष्यवस्तीपासुन दुरच, बरच लांब जस हायस्कुल असाव , समोर लोखंडी गेट आणी पाच सहा फुटांची भिंत... गाडी बाजुला घेत चालत गेटजवळ बनवलेल्या छोट्या खोलीशी आलो.. दुस-या मजल्यावरील काही खिडक्या बंद दिसत होत्या तर तीथच डाव्या बाजुच्या लोखंडी ग्रिल लावलेल्या उघड्या खिडकीतुन किंचीत प्रकाश येत होता, त्यातूनच डोकावणारी एक मानवी आकृति माझ्याकड पहात असल्याच जाणवल... त्या बंद गेटमागुनच वॉचमनला हाक दिली तस बाजुच्या कट्ट्याजवळून चालत डोक्याला मफलर गुंडाळलेली एक वयस्कर व्यक्ति समोर आली, साधारण साठी ओलांडलेली असेल. सावळा रंग , किंचीत बसक नाक, सुरकुतलेल्या चेह-यावर पांढरी खुरटी दाढी दिसत होती.. मला आणी मागे लावलेल्या बाईकला पाहू लागला..
" कोन पायजे....?" मला बघताच त्यांनी प्रश्न केला..
" डॉक्टरसाहेबांना भेटायच आहे...."
" सकाळी या.... मेन डाक्टर सकाळीच भेटणार...."
" सर.... खरतर मला एका पेशंटला भेटायच आहे... आज सकाळी आणलय..." मी चेहरा केविलवाणा करत म्हणालो..
" आता भेटायला परवानगी न्हाय र बाळ. उद्या ये..." शेवटी त्याच्या हातापाया पडून आत जायची परवानगी घेतली तीथ काम करणा-या एका मावशीसमोर हात जोडले
"फकस्त पाच मींट..."
त्यांनी मला एका रूमकडे नेल... स्त्री विभाग होता. बराच गोंगाट माजलेला... कोण जोरजोरात रडत होत तर कोणी किंचाळत होत... कोण गाढ झोपलेल तर कोणी नुसतच किलकील्या डोळ्यांनी आजुबाजूला पहात होत... अशीच एक रुम दिसली....




                       *****

काचेतुन आत पाहील आणी खळ्ळकन डोळ्यात पाणी आल... पांढरट रंगाचा गाऊन अंगात घातलेला, सार शरीर गोळा करून तीच मुसमूसन सुरू होत..
"प्रिया......." माझा आवाज ऐकताच तीनं झटकन वर पाहील... रुक्ष मोकळ्या केसांना चेह-यावरुन बाजुला करत त्या छोट्याशा बेडवरून ती उठुन बसली... मला समोर पाहुन तीला अश्रु आवरेनासे झाले, बेडवरून खाली उतरुन चालत पुढ आली... रडून डोळे लाल झालेले, माझ्यासमोर हात जोडून ती फक्त रडत होती पन निराशेन भरलेल्या तीच्या चेह-यावर एक समाधान दिसत होत...
" चल रे....... खुप झाला इमोशनल ड्रामा.... सकाळी ये....."
" मावशी सकाळपर्यंन्त मी जीवंत राहीन की नाही माहीत नाही हो... थोडा वेळ बोलतो आम्ही..."
प्रियान विनवणी केली तशा त्या मावशींनी हातातला टॉर्चचा प्रकाश तीच्या चेह-यावर पाडत म्हणाल्या...
" तुला आम्ही मरू देत नाही..."
मावशीचे शब्द कानावर पडले तस मी प्रियाकड पाहील... हातानेच खुण केली... ' काळजी नको करूस... मी आहे तुझ्यासोबत.'
तीलाही खुप बर वाटल... आणी माझी नजर तीच्या मागील खिडकीवर गेली... त्या खिडकीच्या पलिकडे कोणीतरी ऊभ होत .



कदाचित पलिकड दुसरी रुम असावी...
" हा महिलांचा वार्ड आहे ना....?" शंका वाटली म्हणुन मी त्या मावशीला विचारल
" हो .... फक्त स्त्रीया मुली आहेत इथ...."
"मग पलिकडच्या रूम मधे तो मुलगा काय करतोय..." तस प्रिया माग पाहु लागली... पन तोवर तो मुलगा तीथुन गेला होता...
" तीथ मुलगाच काय पण कोणाची सावली पन पडु शकत नाही..." ती मावशी जरा अतीआत्मविश्वासुच वाटली....
" हो का..... ते कस....?"
" सांगते.... प्रिया..... ती खिडकी उघाड...." मावशीचा आदेश येताच प्रिया माझ्याकड थोड भयभीत नजरेन पहात खिडकीच्या दिशेन चालु लागली.. मावशी मात्र भलत्याच आत्मविश्वासात होती.. खिडकीपाशी पोहोचल्यावर तीन फिरून आमच्याकड पाहील
" काही नाही होणार. उगाच कशाला घाबरतेस..?" मावशीच्या आवाजात थोडा राग होता जशा त्या खेकसत होत्या.. प्रियान खिडकीची कडी सट्ट कन खाली खेचली आणी कुईईई आवाज करत ती खिडकी उघडली..



 आणी मी समजुन गेलो की पलीकडे रूम नाही तर हीच शेवटची रुम होती, दुस-या मजल्यावरची . आणखी एक एक लक्षात आल की आत येतान खिडकीत दिसलेली आकृती याच रुममधे होती..
" प्रिया... जाऊदे ..मला भास झाला असेल..."
पन ती खिडकीमधे पाठमोरी उभी शांतपने बाहेर पहात होती... मी पुन्हा हाक दिली पन काहीच प्रतिसाद येईना.. तोच एक थंड हवेचा झोका खिडकीतुन आत शिरला तसा सर्रर्रर्रर कन अंगावर काटा आला...
प्रिया म्हणुन मी जोरात ओरडलो तशी ती खिडकी जवळून मागे सरकली आणी पुन्हा घाईघईने खिडकी बंद करून धावत दरवाजाकडे आली...
" तोे मला ठार मारून टाकणार..मला इथुन बाहेर काढा..प्लिज..." ती आमच्या समोर भितीन रडू लागली..
" कोण तो..... कोण मारणार तुला....?"
" तो...... माझ्यावर प्रेम करायचा...."
" तुला काही नाही होणार... मी उद्या डॉक्टरांशी बोलतो..." बोलता बोलता माझी नजर मागे खिडकीवर गेली...त्या पारदर्शी काचेतुन आकाशातील क्षितीजाकडे झुकत जाणारे चंद्रबींब हळुवारपने काळ्याकुट्ट ढगांच्या कवेत सामावून जाऊ लागल. तोच कुईईईईईई असा दिर्घ आवाज करत खिडकी हळुवारपने उघडत होती... प्रियानही आवाज स्पष्ट ऐकला पन मागे पहायची तीची हिम्मत होईना... ती दरवाजावर हात बडवु लागली...
"प्लीज मला बाहेर काढा...प्लिज.."
माझी नजर मात्र प्रियाच्या आठ दहा फुट मागच्या त्या खिडकीवर स्थिरावली . खिडकी बाहेर वरच्या बाजुला कसलीशी हलचाल दिसु लागली.. काहीतरी उलट लटकत होत जे वरूनच आत डोकावत होत...


 आणी इतक्यातच रूममधील भिंतीवरचा पांढरा बल्ब चर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्रर्र आवाज करू लागला.. आम्हा तिघांची नजर त्या बल्बवर स्थिरावली तसा फट्टकन आवाज आला आणी बल्बच्या काचा सर्वत्र पसरल्या...
" काय बाई. ह्या बल्बला पन आत्ताच जायच होत... थांब रे इथच मी ऑफीस मधुन बल्ब आणते.." त्या मावशी चालत ऑफीसच्या दिशेन निघाल्या.. तसा मोबाईलचा टॉर्च ऑन करत मी प्रियाला धीर देऊ लागलो.. ती पुर्ण खचली होती, त्रासली होती. या अमानुष यातनांनी पिचली होती.. वाईट एवढच वाटत होत की मी फक्त धीरच देऊ शकत होतो..
तीच्यासोबत बोलताना माझी नजर पुन्हा खिडकीवर गेली तस वरच्या दिशेन एक काळी गडद्द आकृती सरपटत त्या रुममधे प्रवेश करू लागली..
भितीने माझ्या अंगावर शहारा आला... प्रियाला सांगितल तर ती काय होईल या विचारानच मी सुन्न झालो...
"प्रिया तु घ...घाबरू नको... मी स.. सोडवतो तुला इथुन... " माझ्या आवाजातही कंप सुटला... मी ऑफीसच्या दिशेन पाहील आणी जोराची हाक दिली...
"मावशी लवकर या..." आणी पुन्हा समोर पाहील तसा भितीन घाम फुटला... डोळे विस्फारले. त्या खोलीत प्रियाच्या अगदी हातभर अंतरावर एक काळी गडद्द सावली उभी होती... काळीकुट्ट धुसर ती आकृतीच्या चेह-यावरील लालसर डोळ्यांसारखे दोन ठिपके जसे माझ्यावरच रोखले होते... प्रिया दरवाजावर डोक टेकून खाली पहात मुसमूसत होती ..
"मावशी ..... या लवकर...... " मी पुन्हा हाक दिली तशा मावशी झपाझप पावले टाकत येऊ लागल्या... त्या आकृतीने आपले दोन्ही हात हवेत पसरले आणी प्रियावर झडप घालणार तोच मावशी दरवाजाच कुलूप उघडू लागल्या... घाईघाईत कुलूप काढून दरवाजा उघडला तशी ती सावली कुठतरी नाहीशी झाली...
मी उंच हाताने तो बल्ब बसवला तशी रूम पुन्हा पांढ-या एलएडीच्या प्रकाशान उजळून निघाली... प्रिया कड ती कोप-यातल्या छोट्याशा बेडवर गुडघ्यात मुंडक खुपसुन बसलेली, लांब विस्कटलेल्या तीच्या रूक्ष केसांनी चेहरा पुर्ण झाकला गेलेला.. अगदी शांत.. मघापासुनच रडण, मुसमुसन सार बंद झालेल...




"प्रिया.....?" मी तीला हाक दिली तस आपल्या उजव्या हातच एक बोट बेडवरील बेडशीटवर वेडवाकड फिरवु लागली जशी ती एखादी आकृती काढतेय...
" प्रिया.... बर वाटतय ना....?"
मी पुन्हा विचारल तशी आपल्या बोटाची हलचाल थांबवली पन मुंडक तसच गुडघ्यांमधे खुपसलेल... हळुच ते बोट आपल्या तोंडात घातल .. मी आणी मावशी तीच्याकड पहातच होतो तोच खट्टकन आवाज आला... आम्ही दोघेही तीची गुढ , शांत हलचाल पहात होतो तस तीन शांतपने तोंडात घातलेल बोट बाहेर काढल तर त्याला रक्ताची धार लागलेली... ते बोट तसच बेडशीटवर फिरवू लागली... आर्ध बोट तीन दातांनी तोडल होत , त्यातून भळाभळा येणा-या रक्ताची धार लागलेली
मी धावतच तीच्याकड गेलो तीच बोट दाबून धरत रक्त थांबवायचा प्रयत्न करू लागलो...
" मावशी .....डॉक्टरांना कॉल करा आणी firstadd बॉक्स आणा.... लवकर...."
तशा त्या पुन्हा ऑफिसकडे धावल्या...
" प्रिया.... काय करतेस हे.....?" मी बोट दाबुन धरतच म्हणालो तस मघापासुन गुडघ्यात खुपसलेल मुंडक वर काढत तीन माझ्याकड पाहील... अर्ध्या चेह-यावर विस्कटलेले केस पसरलेले , पांढरे विस्फारलेले डोळे माझ्यावर रोखलेले तर तोंडातुन ओघळणारी रक्ताने माखलेली लाळ हनुवटीवरून गळ्यावर पसरलेली..तोंडात काहीतरी चघळत जबडा हळूवारपने हलवत होती
तीची अवस्था पाहुन डोळ्याच्या कडा नकळत
पाणावल्या आणी संतापही आला त्या क्रुर पिशाच्चाचा.... तिच्या विस्फारलेल्या डोळ्यात पहात म्हणालो..
" का इतक्या यातना देत आहेस तीला ....? हेच का तुझ प्रेम...? जीच्यावर स्वतापेक्षा जास्त प्रेम कराव, जीला आपल सर्वस्व मानाव, जीच्या पायात काटा रूतला तर आपल्या काळजात कट्यार उतरल्याच्या यातना व्हाव्या त्या मुलीची अशाी अवस्था करून तीच्यावरच आपल प्रेम सिध्द करतोय का....?"
माझ बोलण ऐकताच ती जोरात समोरच्या भिंतीवर थुंकली तस तीच्या तोंडातुन लाल रक्तासोबत निघालेला तुकडा भिंतीवर आपटुन गोल गोल फिरत कोर-यात स्थिरावला. दातांनी तोडलेला स्वता:च्या बोटाचा तुकडा डोळे विस्फारून पहात म्हणाली....



" प्रेम......? हं...." हसत तीची क्रुर नजर माझ्यावर स्थिरावली... तीच्या आवाजात घरघर वाढली
" प्रेम आहे म्हणुन तर सोबत न्यायला आलोय.." आणी ती क्रुरपने हसु लागली
" तीच्या मनात नसताना...? " मी ही त्या क्रुर नजरेला नजर भडवली... तसा तीच्या
चेह-यावरचे भाव आणखी रागीट होऊ लागले... घरघरत्या आवाजात झटकन आपला चेहरा माझ्या चेह-याजवळ आणत म्हणाली
" माझ प्रेम आहे ना तीच्यावर... आणी जे मला आवडत ते मिळवतोच.... मग त्यात कोणाची मर्जी असो वा नसो..... समजलास... " आणी दिर्घ श्वास आत घेत वर छताकडे पहात डोळे विस्फारून बेशुद्ध होत बेडवर पडली.. मावशी धावतच आत आल्या... तीची जखम स्वच्छ करून पट्टी बांधली तशी पुन्हा शुद्धीवर आली , पन यावेळी बोट तुटल्याने झालेल्या जखमेन तीला भयंकर वेदना होत होत्या ... रडत कण्हत बेडवर पडून ती आपल्या यातना सहन करत होती... तीला धीर देता देता मला गहीवरून येत होत... तीच्याकड पहात मावशींना विचारल...
"डॉक्टरांना फोन केलात....?"
" हो.... उद्या सकाळीच शॉकट्रीटमेंटसाठी घेऊया म्हणालेत..."
" शॉक ट्रिटमेंट.....? " त्यांच बोलण ऐकताच मला धक्का बसला...
" हो.... तीला बेडसोबत बांधुन ठेवायला सांगीतलय आणी तु ही जा आता...." तशी त्यांनी सोबत आणलेली इलास्टीकची पट्टी बाहेर काढली... मी प्रियाकड पाहील, हतबल असहाय्य पने डोळ्यातुन घळाघळा अश्रु येत होते... आपला जखमी हात एका हाताने दाबून धरत मला म्हणाली,
" संजु..... जा तू.... जे नशीबी लिहीलय ते भोगायलाच हव.... तु वाईट वाटुन घेऊ नको..."
ती हुंदके देऊन रडु लागली तशा हातातला बेल्ट घेऊन मावशी पुढ आल्या...
" मावशी...... प्लीज...... ती भोगतेय त्या यातनही खुप आहेत आणखी त्या जिवाला देऊ नका हो... प्लीज... थोडा वेळ द्या... तीला या अवस्थेत सोडुन जायची हिम्मत होत नाही हो..." मी हाथ जोडुन विनंती करत होतो तशा आम्हा दोघांकडे पहात त्या म्हणाल्या..
" प्रेम करतोस तीच्यावर....?"
" न..... नाही.... मित्र आहे फक्त...."
" दिसतय ते....... जखम झालीये तीला, आणी त्रास होतोय तुला....हं... ठीक आहे मी आहे बाहेर..."
बोलुन त्या बाहेर पडल्या तस मी प्रियाकड पाहील...
" घाबरू नकोस.... काहीतरी उपाय शोधेन मी..."
माझ्या बोलण्याचा काहीच फरक तीच्यावर पडला नाही कदाचित तीला आपला शेवट दिसला होता... कारण त्या खोलीत आमच्या व्यतीरीक्त कोणीतरी होत जे प्रियाला अस तळमळताना पाहुन खुश होत त्याच्या खदखदण्याचा मंद आवाज या भिंतींमधे घुमू लागला....
" उद्या सकाळी पौर्णीमा संपण्याआधी तो तीला सोबत नेईल...."
प्रियाच्या रुमसमोरच्या एका अंधा-या खोलीतुन कुण्या वयस्क स्त्रीचा आवाज आला...
" ए काळ्या जिभेचे...... तोंड बंद कर नाहीतर उद्या तुलापन करंट देईन....."
आपल्या खुर्चीवरूनच मावशी तीच्यावर खेकसल्या... माझी नजर त्या आवाजाच्या दिशेला स्थिरावली, आपली जखम दाबून धरत प्रिय बेडवरून उठली आणी दरवाजातुन दिसणा-या त्या खोलीकडे पाहु लागली..
त्या खोलीच्या गडद्द काळोखान माखलेल्या
कोप-यातुन कोणीतरी सावकाश पुढ चालत आल... आणी बाहेरच्या बल्बच्या किंचीत प्रकाशात तीचा चेहरा दिसला... एक साठी पासष्ठी पार केलेली वयस्क स्त्री समोर होती...

 केस बरेच पांढरे पडलेले, तीच्या चेह-यावरची
 पांढरी सुरकूतलेली त्वचा हाडांच्या कवटीला चिकटेल्या कागदाप्रमाणे वाटत होती इतकी बारीक ती म्हातारी , लांब पोपटाच्या चोचीसारख नाक, डोळ्यांवरच्या चष्म्याची एका बाजुची काच फुटल्याने कोष्ट्याच्या जाळ्यासारखी दिसत होती..
सुरकुतलेल्या चेह-यावर किंचीत हासु पसरताच तोंडातल्या बोळक्यातले दोन तीन दात पडलेल लक्षात आल.
" तुम्ही कोण..... आणी काय बोलताय....? " मी जरा रागातच म्हणालो... तसा बाजुच्या खुर्चीवर डुलकी घेत बसलेल्या मावशी म्हणाल्या,
" ती 'सुजाता' आहे.... तीला क्रुर भटकणारे आत्मे दिसतात म्हणे... आम्हालाच का ही भुत दिसत नाही काय माहीती....काय काय नमुने या हॉस्पीटल मधे भर्ति होतात....?" आणी पुन्हा खुर्चीवर डुलकी घेऊ लागल्या..
" जरा स्पष्ट सांगाल.....?" मी दबक्या स्वरात म्हणालो...
" तो हीला आपल्या सोबत न्यायला आलाय..." सुजातांचा गंभीर आवाज आमच्या दोघांच्या काळजातल उरलासुरला धीर ही संपवत चालला...
" तीला अशाच यातना देऊन पौर्णीमेला लागलेल ग्रहण संपण्याआधी ठार करेल.. तीचा आत्मा शरीरातुन बाहेर पडताच त्या आत्म्यावर कब्जा करेल आणी मग एका गुलामाप्रमाणे यातना देत राहील , वर्षानुवर्ष.. एक क्रुर लिंगपिसाट नराधम शेवटी हेच करू शकतो..."
" हे सगळ तुम्हाला कस माहीती... त्याच्या क्रुरपनाबद्दल...?"
प्रिया आश्चर्यान विचारू लागली... तस त्यांच्या चेह-यावर गुढ हास्य पसरल...
" त्याचा आत्मा तुझ्याभोवतीच घुटमळतोय.. अखंड बडबड करत या रात्रीच्या आधी तुझा अंत होईल हे सांगतोय..." त्या क्लिष्ट हास्यानंतर सुजाता एकदम शांत गंभीर आवाजात म्हणाल्या.
"त्यान 'प्रपोज' केलेल ना तुला...? तुझ शरीर हव होत त्याला... पन त्याला नकार ऐकण्याची सवय नव्हती ... आणी आपली झाली नाही म्हणुन तीला नरकयातनेन तडफडण्याची वेळ आणणारा क्रुरच असतो... आणी तो लिंगपिसाट आहे हे तुला चांगल माहीत आहे...."
सुजाता बोलता बोलता थांबल्या.
त्यांच बोलन ऐकुन प्रिया हादरून गेली...
" मी आता काही क्षणांचीच सोबती आहे रे... पन तुला सगळ सांगते..."
मी प्रियाकड प्रश्नार्थी नजरेन पहात होतो...
" हे वयच अस असत ना.... आपल्या मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवायचा. दंगा , मस्ती , आयुष्य मनमुरादपने जगायच... ....."
बोलता बोलता प्रियान माझ्याकडे पाहील...
" पन सगळच मनासारख होत नाही ना...?"
ती मागे फिरून आपल्या बेडवर बसत शुन्यात पहात म्हणाली
" 'संजय' नावाचा मुलगा माझ्या लाईफमधे आला आणी असच सार जग बदलुन गेल... मी कॉलेजची ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली तेव्हा तो आपल्या 'नगरसेवीका' आईसोबत गेस्ट म्हणुन आलेला.. उंच ,देखनाा, त्याच्या फिट्ट कपड्यातुन पिळदार शरीर स्पष्ट जाणवायच.. स्ट्रेट काळेभोर केस, खुरटी कोरलेली दाढी.. कुठलीही मुलगी सहज अॅट्रॅक्ट व्हावी असाच तो मला पाहताच माझ्या प्रेमात पडला.. खुपच उतावीळ स्वभावाचा एका दिवसात माझा मित्र बनला आणी दोन दिवसांनी मला 'प्रपोज' केल...."
प्रिया अगदी शांतपने बोलत होती...
" मग काय झाल....?"
तशी माझ्याकडे पहात म्हणाली
" मी नाही म्हणाले. कारण मी त्याला नीट ओळखतही नव्हते...आणी तिथच माझ आयुष्य बदलुन गेल... त्यान माझा पाठलाग सुरू केला... एकदा काही गुंडानी माझी छेड काढली तेव्हा त्यानच मला वाचवल... पन नंतर समजल की ते त्याचेच मित्र होते... मला आपल्या जाळ्यात खेचण्याचा प्लान होता. मी नाही बोलतेय हे त्याच्या पचनी पडेना...नाना शक्कल लढवत होता...असच एक दिवस एका मैत्रिणीन मला मेसेज करून कॉलेजच्या मागच्या इमारतीत बोलावल... कन्स्ट्रक्शन च काम बंद पडलेली ती इमारत पडीक झालेली...



मी पोहोचले पन तीथ माझी मैत्रीण नव्हती ...."
"मग.......?" मी तीच्या खिन्न चेह-याकडे पहात म्हणालो..
" सर्वत्र शोधले पन कुठेच दिसत नव्हती ... मी मागे फिरले तसा मागे संजु तीथ उभा दिसला... त्याला पहाताच मी घाबरले.. माझा हात पकडून त्याने जवळ खेचले आणी प्रेमाचा होकार ताकतीच्या जोरावर मागु लागला..., अचानक घडलेल्या प्रकारान पुरती हादरून गेले... त्याला प्रतीकार करत होते पन त्यान माझ्यावर जबरदस्ती करायला सुरू केली..."
प्रियाला आता अश्रु अनावर झाले... पन आवंढा गिळत तीन डोळे पुसले आणी पुन्हा सांगु लागली...
" आमच्यात झटापट सुरू झाली, पन मी दुबळी ठरू लागले . त्यान मला जमीनिवर पाडल आणी माझ्या अंगावर झेपावला... माझ शरीर निर्दयीपने कुस्करत वासनेन भरलेल्या नजरेन आधाशासारखा पहात म्हणाला...
' काय औकात आहे ग तुझी. तुझ्यासारख्या कितीतरी पोरी वापरून फेकून दिल्या मी.. कारण मला जे आवडत ते मी मिळवतोच. मग ते समोरच्याच्या मर्जीने किंवा मर्जी विरूध्द..'
मी प्रतिकार करत होते ओरडण्याचा प्रयत्न करत होते पन माझ तोंड त्यान दाबुन धरलेल... वेदनेन मी रडत होते पन त्याला दया येत नव्हती ... त्या झटापटीत माझ्या हाताला एक लोखंडी सळी लागली, कदाचीत बांधकामातली असेल... जोराने त्याच्या मस्तकात घातली... तसा कळवळत माझ्या अंगावरून बाजुला झाला... मी रागान वेडी झालेेले.. एका मगुन एक प्रहार करत होते . तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर लोळत होता... मी तिथुन धावत बाहेर सुटले आणी तुटलेल्या चौकटीतुन पुन्हा मागे वळुन पाहील तर तो जमीनीवर पालथा पडलेला.. रक्तान माखलेल्या चेह-यावर धुळ, माती चिकटली होती
त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेल आणी तसाच रखरखत्या नजरेन मला पहात होता..."
" मग..... तु पोलीसात नाही कळवलस...?"
" पोलिसात...हं..... ज्या ज्या मुलींनी त्याच्या विरूध्द पोलिसात तक्रार दिली त्यांच घरातुन बाहेर पडणही संजयच्या मागे तुकड्यासाठी शेपटी हालवत फिरणा-या कुत्र्यांनी मुश्कील केल रे... एका मुलीन तर गळफास घेऊन आत्महत्या केली आणी राजकिय ताकत वापरून त्यान ती केस दाबून टाकली... पोलिस खिशात घेऊन फिरणारा युवा नेता होता तो.. हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेल.. आणी मी ही केस केली असती तर...? ही गोष्ट समाजातील त्या लोकांना समजली तर काय होईल...? त्या नराधमान एकदा रेप करायचा प्रयत्न केला पन या समाजातले नरपिशाच्च रोज , येता जाता, दिसेल तीथे वासनांध नजरांनी , काटेरी बोच-या शब्दांनी दररोज 'रेप' करत रहातील..''
"मग कॉलेजमधे.. घरी कोणाला बोललीस..?"
" नाही... मी रिक्शा पकडून घरी आले.. कुणाला काहीच बोलले नाही.... खुप रडले.. खोलीत एकटीला कोंडुन घेतल.. माझी निरागस स्वप्नांची राख , राख झाल्यासारखी वाटलीत... मी पंधरा दिवस कॉलेजला गेले नाही.. त्या इमारतीत कोणीच जात नव्हत... दोन चार दिवसात शहरातली काही भटकीा कुत्री त्याच प्रेत फरफटत रस्त्यावर आणुन फाडुन खात होते त्याच्या हातापायाची बोटे , चेहरा शरीर उंदरांनीही कुरतडून खाल्लेली आणी त्यावेळी सगळ्यांना समजल 'संजय' सारख्या राक्षसाचा खुन झालाय...."
ती काहीशी शांत झाली आणी पुन्हा बोलु लागली....
" मला वाटल सगळ संपल पन नाही , काही दिवसातच मला विचीत्र भास होऊ लागले. कदाचीत मानसिक धक्का बसलेल्याचा परिणाम असेल म्हणुन मी गप्प राहीले... पन ते भास जिवघेणे ठरू लागले... कोणीतरी शरीर आतुन कुरतडून टाकत असल्यासारख्या वेदना होऊ लागल्या..... स्वताःला इजा करून घेऊ लागले पन एकदा त्यान आपल अस्तीत्व दाखवुन दीलच .....''
ती ऊठली आणी माझ्या गळ्यात पडुन रडू लागली...
" जे केलस ते योग्यच होत... आणी तो आता जिवंत असता तर त्याही पेक्षा भयानक मरण मी त्याला दील असत.. आणी हो मी आहे तुझ्या सोबत 'जीव गेला तरी'...."
" या नावाचा मला तीटकारा आलेला , तीरस्कार वाटत होता... पन त्याच नावाचा एक छान मित्र भेटला तुझ्या रूपात, पन तु मला 'प्रपोज' केलस आणी मी हादरून गेले.... पुन्हा सगळ डोळ्यासमोर उभ राहील...आणी दुर राहु लागले.."
मी तीच्या डोक्यावरून हात फिरवत धीर देऊ लागलो
" तुला मित्र हवा ना.... मग आयुष्य आहे तोवर तुझा मित्र राहीन......"
तसा समोरच्या खिडकीतुन थंड हवेचा एक झोका अंगाला स्पर्श करून गेला तशी प्रिया शहारली. अचानक तीन मला जोराने मागे ढकलुन दीलं...
मी आश्चर्यान तीच्याकड पाहू लागलो... तीन आपली नजर भिंतीवरच्या बल्बवर नेली... चर्रर्रर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करत फट्टकन फुटला आणी त्या खोलीत पुन्हा काळोख पसरला झटकन तीन आपली मान माझ्याकडे वळवली तसे तीचे विस्कटलेले केस चेह-यावर पसरले... ती समोर ऊभी होती आणी तीच्या मागे खिडकीमधुन मावळतीला गेलेल्या चंद्राचा मंद प्रकाश तीच्यावर पडलेला पन त्यामुळे जमीनीवर पडलेली प्रियाची सावली वेगळी होती.... एक आक्राळ विक्राळ श्वापदाची सावली होती.... अचानक तीच्या आवाजातली घरघर वाढली..


" तीनं माझ प्रेम लाथाडुन टाकल आणी तुला चिकटचेय..." तीच्या रागीट चेह-यावर विचीत्र हास्य पसरल. माझ्याकडे पहातच ती उजव्या हाताच करंगळी तोंडात घालु लागली तसा मी पुढ धावलो... तीचा हात गच्च पकडुन धरला तसे एका झटक्यासरशी तीचे केस चेह-यावर आले...
"मावशी ....." मी जोरात ओरडलो तशी त्या खडबडून जाग्या झाल्या....
"बेल्ट घेउन या लवकर..."
" फक्त थोडा वेळ आणी इथ एक देह निश्प्राण होऊन पडणार...ही ही ही...."
"गप ग सट्टवे... काळ्या जीभेची सटवी.." मावशी त्या समोरच्या बाईवर ओरडत आत आल्या... प्रियान आपल्या रक्ताळलेल्या डोळ्यांनी माझ्याकड पाहील तशी माझ्या पायाखालची जमीन सरकली... मी तीचे हात घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत होतो पन विचीत्र हास्य करत तीनं माझा हात घट्ट पकडला.. एक राक्षसी शक्ति तीच्या शरिरात होती.. माझ्याकडे पहात तीनं माझा हात हळुहळू आपल्या जबड्याजवळ घ्यायला सुरवात केली तसा माझ्या काळजाचा थरकाप उडाला..
"मावशी... प्लीज लवकर या....." माझा आवाज ऐकुन धावत आलेल्या मावशी त्या काळोखात हतबल पने पहात ऊभ्या होत्या.. काय करावे सुचत नव्हते...मी स्वताचा हात सोडवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत होतोच की इतक्यात खट्टकन आवाज आला.... आडकित्त्यात घालुन सुपारी मधोमघ फोडावी अशा आवाजासोबतच शरीरात लाल मुंग्यांच जस वारूळ उठल..
भयंकर वेदनेन एक आर्त किंकाळी माझ्या तोंडातुन बाहेर पडताच आपल्या घोग-या आवाजात खदखदणार हास्य प्रियाच्या तोंडातुन बाहेर पडल... आणी धाडकन ती जमिनीवर पडली.... शुध्द हरपुन....


                        ****


तीला उचलुन बेडवर झोपवले बेल्टने घट्ट बांधुन घातले... माझा ऊजव्या हाताचा अर्धा अंगठा तीन दातात धरुन तोडलेला.. मलमपट्टी करुन तसाच भिंतीला टेकुन तसाच बसुन होतो.. असह्य वेदना होत होत्या.. मेंदु बधीर झालेला..



" मृत्यु अटळ आहे.. तो आलाय.... पन अजुन थोडा वेळ आहे..."
" ए काळ्या जीभेचे.... गप्प....." मावशी तीच्या बोलण्यावर चांगल्याच संतापल्या आणी जीना उतरत बडबडतच खाली जाऊ लागल्या.... तशा 'सुजाता' आपल्या रुमच्या दरवाजा जवळ येत त्या म्हणाल्या...
" तीच शरीर त्या सैतानाच्या आत्म्याच ओझ आणखी सहन करू शकणार नाही.. संपेल ती...."
मी दरवाजा तुन आत पाहील.. प्रिया निपचीप पडलेली.. आपल्या शेवटच्या घटका मोजत, नरक यातना भोगत, मृत्युच्या भयान जबड्यात, एकसारख डोळ्यातुन पाणी येत होत...
त्यानी मला आपल्या रुमजवळ बोलवल...
" तीला वाचवाव आस वाटतय तुला...?"
" हो.." कसलाचा विचार न करता मी उत्तर दील..
"एक मार्ग आहे....."
" कोणता..... ? मी काही करायला तयार आहे..."
त्या एक एक शब्द बोलत होत्या... मी मनापासुन सगळ ऐकत होतो.. त्यांच बोलण थांबल आणी मागे सरकत त्या काळोखात दिसेनाशा झाल्या... मी तसाच उभा होतो... सुन्न....
" घाबरलास.......?"
" हं....... न नाही......." मी भानावर आलो... प्रियाकड पाहील तीच्या शरीरात किंचीत हलचाल होत असली तरी वेदनेन ती अजुनही कण्हत होती.... मी हळूच दरवाजा उघडुन आत गेलो...बेडजवळ जात तीच्या चेह-याकड पाहील... आणी डोळ्यातुन पाणी येऊ लागल.
किती सुंदर निरागस होती.. तीच्यासोबत घालवलेले ते क्षण डोळ्यासमोर उभे राहीले...
हसणारी, हसवणारी, करणारी मस्करी करत पुन्हा सॉरी म्हणनारी.. आता स्वताच्या मृत्युची वाट पहात पडून होती.. पुर्ण हतबल, थकलेली, बेशुद्ध अवस्थेतही तीच्या डोळ्यातुन ओघळणारे अश्रु.... किती भयंकर होत सर्व..
तीेच्या डोक्यावरून हळुवारपने हात फिरवला ... खुप वाटल तीच्या कपाळाच चुंबन घ्याव पन मला तो अधिकार तीन दिला नव्हता...
ताडकन उठलो आणी झपाझप पावल टाकत हॉस्पीटलच्या त्या शेवटच्या रूममधे गेलो...


 बाथरुम होत ते.. एक मोठा चौकोनी आरसा समोर होता... त्या आरशात स्वता:ला पाहील , तोंडावर पाणी घेतल . थोड पाणी प्यायलो थोडा वेळ तसाच बॉशबेसिनकडे पहात राहीलो... त्या बाईने कोणताच उपाय सांगितला नव्हता फक्त एक वाक्य बोलली होती... फक्त एक वाक्य.... ज्यात खुप मोठा अर्थ लपला होता
'विषाला विषच मारत....'
खिशातला धारदार चाकु बाहेर काढला आणी समोर आरशात पाहील... खिशातुन मोबाईल काढला... हे घटनासत्र तुमच्यासमोर कथन करतोय.. तुटलेल्या आंगठ्यावरची पट्टी काढताना भयंकर वेदना होत आहेत.... रक्ताची धार लागलीय. त्याच रक्तान आरशावर तीन शब्द लिहीतोय.... I Love तीसरा शब्द लिहीण्याइतपत वेळ नाही माझ्याकडे... एक धुसर काळीकुट्ट आकृति बाथरूमच्या उजव्या कोप-यात उमटताना दिसतेय...... मी रखरखत्या डोळ्यानी त्या आकृतिकडे पहातोय...
" ती आज तुझ्या विळख्यातुन मुक्त होईल..बाहेर बघ, सुर्य रात्र संपवायला येतोय...आणी मी तुझ अस्तीत्व संपवायला...."
त्या आकृतिन आपल जबडा पसरला आणी माझ्यावर झेपावणार तोच मी तो चाकु उजव्या हाताने घट्ट पकडुन स्वताच्या गळ्यावर ठेवला, डोळे बंद केले तसा प्रियाचा निरागस चेहरा काळजावर उमटला आणी.............'
युवकाचे शब्द संपताच खस्सकन आवाज आला आणी काही वेळ बाथरूमच्या फर्शीवर तडफडण्याचा आवाज रेकॉर्ड झालेला.. तो मेसेज बंद करत इन्स्पेक्टर शांतपने उभे राहीले आणी मोबाईल एका प्लास्टीकच्या पिशवीत घालुन फोरन्सिक लैबला पाठवायला हवलदारांकडे दिला..
"हं.... या ऑडीओ क्लिपवरून तर वाटत की या मुलान आत्महत्या केलीये... प्रेत आधी कोणी पाहील...?"
" साहेब... हे बाथरूम खराब आहे म्हणुन इकड कोणी येत नाही.... मी दुपारी सफाई करायला आले तेव्हा दिसल..."
"हम्म..... आणी ती मुलगी......?"
" तीला रात्रभर वेड्याच झटक येतच होत. पन आज सकाळी तीच्या रूमच्या खिडकीची काच फुटल्याचा आवाज आला म्हणुन आम्ही येऊन पाहील तर हळुहळू शुद्धीवर येऊ लागलेली.. अंगातला अशक्तपना हळुहळू नाहीसा होऊ लागला... त्यानंतर बराच वेळ यालाच फोन करत होती पन लागत नव्हत, मग आपल्या घरी फोन केला आणी.... पन तीला आम्ही सांगितल नाही अजुन.....अरे...आत्ता आली होती. इथ दरवाजा शेजारी होती..."
मावशी आश्चर्यान आजुबाजूला पाहू लागल्या
इन्स्पेक्टर मावशीकड पहात म्हणाले..
" ठीक आहे... तीचीही चौकशी करावी लागेल...."
इतक्यात खिडकीपलिकडून काहीतरी खाली पडल्यासारखे दिसले... बाहेर गोंधळ माजला
" साहेब...?" पोलीस हवलदार धावत आले...
"काय झाल शिंदे....?"
"साहेब... एका मुलीन टेरेसवरून उडी मारलीये...."
" काय.....?"
" प्रिया.......???" मावशी जोरात किंचाळल्या तसे सर्वच धावत बाहेर पडले.. इमारतीच्या बाहेरील पटांगणात 'ती' खाली जमीनीवर पडलेली. डोक्यावरचे केस जमिनीवर विस्कटलेले
इन्स्पेक्टर साहेब धावतच तीच्या जवळ जात तीच्या हाताची नाडी पहात ओरडले,.. जीवंत आहे.... गाडी घ्या.... . hurry up, hurry up
फास्ट....




                 *********************

दोन दिवसांनी...
" साधारण पंचवीस ते तीस फुट उंची असेल... एवढ्या उंचीवरून पडुनही तीला काहीच लागलेल नाही... आश्चर्य आहे...."
डाॅक्टर इन्स्पेक्टरांशी बोलतच प्रियाच्या रुमकड निघाले...
" खुप काही आश्चर्यकारकच घडत चाललय.. बाहेर मिडीयान तर तीची स्टोरी फ्रंटपेजवर छापलीये..."
दोघे बोलत रूममधे आले...
" हैलो.... कश्या आहात... "
प्रियान हळुवारपने डोळे उघडत साहेबांकडे पाहील... बाजुला बसलेली तीची आई आणी बाबा उठुन उभे राहीले.. त्यांना बसायला सांगत इन्स्पेक्टर प्रिया सोबत बोलु लागले...
" तुझ्या हातुन स्वता:ची इज्जत वाचवताना एक खुन झाला... त्या नराधमाला वेळीच वचक बसवली असती तर हे सर्व घडलच नसत पन कायद्याप्रमाण तुला अटक कराव लागणार..."
प्रियाच्या डोळ्यात पाणी आल...
" पर्वा नाही साहेब... पन माझ्यावर मनापासुन प्रेम करणारा कायमचा मला एकट सोडुन गेला हे सहन होत नाही..."
प्रियाला अश्रु अनावर झाले...
इकत्यात तीच्या रुममधे तीच्या कॉलेजचे काही मित्र मैत्रिणी आल्या.. सोबत आणलेला बुके प्रियाकड देत तीची मैत्रीण बोलु लागली.
" प्रिया... फक्त आपल्याच शहरात नाही आख्या महाराष्ट्रात तुझ नाव गाजतय... तु केलस त्या बद्दल प्रत्येकजण तुझ कौतुक करतोय... प्रत्येक मुलीन संजय सारख्या नराधमांना वेळीच ठेचल पाहीजे म्हणुन वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लेख येत आहेत. डीबेट होतेय, गावागावात चर्चा होतेय..... आणी हो. त्या नराधमांना पाठीशी घालणा-या पोलिस अधिका-यांनाही सरकारन सस्पेंड केलय....."
एका मित्रान बोलतच खिडकीचा पडदा बाजुला केला...
" प्रिया.... बाहेर तर बघ..."
तीन आपल्या दुस-या मजल्यावरील खिडकीतुन बाहेर पाहील तर खाली संपुर्ण काॅलेज तीच्यासाठी रस्त्यावर उतरलेल... त्या जमावाकडे पहाताना तीच्या डोळ्यातुन घळाघळा पाणी येऊ लागल... मनात त्याचा विचार येताच तीनं डोळे बंद केले आणि सार काही क्षणात थांबल्यासारख वाटल... कसलाच आवाज, गोंगाट नव्हता. अगदी सुखद शांतता पसरलेली इतक्यात समोर शुभ्र प्रकाशातुन उमटणारी एक धुसर आकृती ती न्याहाळू लागली...ती आकृति स्पष्ट झाली तसा तीच्या चेह-यावर समाधानाच हासु पसरल.. त्याला पाहताच धावत त्याच्याकड जाऊ लागली
" प्रिया... " समोर तो उभा तीला साद घालत होता... त्याच्या गालावर हल्की चपाट मारत रडतच त्याच्या गळ्यात पडली...
"मला ही तुझ्या सोबत यायच होत... का मला वाचवलस...? " प्रिया त्याच्याकड तक्रार करत होती....
" मित्र माणतेस ना मला... मग आपल्या मैत्रिणीसाठी मी एवढही करू नये....?"
" माफ कर रे मला... प्रेम नाही समजु शकले.. तुला गमावल रे मी... " गालावरून ओघळणारे तीचे अश्रु स्वच्छ करत त्यान तीच्या डोक्यावरून हल्केच हात फिरवला. ...
" प्रेम म्हणजे काय, हे मलाही नाही माहीत . पन तुझ्या डोळ्यात पाणी मला कधी पहावलच नाही.. आता मी तुझ्या या सुंदर आयुष्यात नाही पन तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आयुष्यानंतरही माझ्या सोबत आहे.. माझ्या आत्म्याला तेवढ समाधान नक्कीच आहे...." एवढ बोलुन त्याची आकृती तीच्यापासुन दुर दूर जाऊ लागली
"प्लीज थांब रे... मला अस एकट नको रे सोडु... मला तु हवा आहेस रे...प्लिज परत ये रे.."
ती साद घालत राहील, त्याच्या अंधुक होत चाललेल्या आकृतीमागे धावत राहीली पन 'तो' मात्र डोळे दिपवणा-या प्रकाशात नाहीसा झाला....
तशी क्षणात प्रिया भानावर आली.. खिडकीतुन खाली पाहील तर बाहेर लोक पुष्पगुच्छ घेऊन तीच्यासाठी उभे होते... त्या गर्दीकडे पहात ती मनात पुटपूटली..
' मला माहीत आहे तु या गर्दीत नसलास तरी माझ्या सोबत आहेस. माझ्या सुखा, दुखा:त. माझ्या स्वप्नात. I love..."
तोच खिडकीतुन आत आलेल्या एक थंड हवेचा स्पर्श तीला जाणवला.. 


समाप्त.....