!!!.......कथा एका जन्माची....!!!
by Sanjay kamble
"काय हा वेडेपना आहे .. या टोपल्या घेऊन आम्ही शहरात जायच का..."
अविनाश रागातच म्हणाला तसे त्याचे सासरे केविलवाण्या स्वरात बोलू लागले..
" जावईबापु.....ही आपली परंपरा हाय.. पोर सासरी निघाली की तीला शिदोरी द्यावी लागतीया... तुम्हास्नी हे सम्द बाजारात इकतही घेता यतय पर तीच्या आईन आण भनी बाळींनी रातीला जागरण करून बनीवलया... न्हाई म्हणू नगा...."
सास-यांचे शब्द ऐकताच अविनाश बाहेर जाऊन आपल्या आलिशान मोटारीत बसला..
प्रिया ने ही आपल्या आई वडिलांच्या पायाला स्पर्श करत गळ्यात पडून थोड मन हलक केल... आणि मोटारीत जाऊन बसली.. आज ती सासरी निघाली होती.
डोंगराळ भाग असलेल प्रियाच माहेर एक छोटस खेड असल तरी तीच्या वडीलाना मोठा मान सन्मान होता... शिक्षण पुर्ण झाले आणि चांगल स्थळ चालून आल. अविनाश तीच्यापेक्षा १० ते १२ वर्षानी मोठा होता.. पन घर, गाडी, बंगला खुप मोठे लोक म्हणून मोठ्या आनंदान तीच लग्न लाऊन दिल..
जुन महीण्यातील मृगनक्षत्राचे ढग पावसाच्या सहस्त्र धारांचा वर्षाव करत होते... डोंगर द-यातून खळखळणारे छोटे छोटे झरे, हिरवीगार वनराई, दाट ऊंच ऊंच झाडे, त्यातच डोंगरावर उतरलेला एखादा पांढराशुभ्र 'मेघ' वा-याच्या संथ झोक्यासोबत हळूहळू पुढे सरकायचा... त्या धुक्यातून वाट काढत त्यांची मोटार खाली उताराला आली, तसे एखाद्या तुडूंब भरून वहाणा-या ओढ्याजवळ उभ्या बाभळीच्या काटेरी झाडावर वा-याच्या झोक्यासोबत हेलकावे घेणारी पक्षांची गवताच्या काड्या विणुन तयार केलेली छोटी छोटी फिक्कट पिवळ्या रंगाची घरटी... आणि त्यातूनच आपले भीजलेले पंख झाडून पुन्हा भरारी घेणारे रंगीबेरंगी पक्षी... आपल्या माहेरचा नेहमी डोळ्यासमोरचा हा निसर्ग आज तीच्यासाठी परका झाला होता... माहेरच्या या आठवणी मनात साठवत तीचा प्रवास सुरू झाला....

शहरात पोहचले तेव्हा रात्र पडू लागली होती पन पावसाचा जोर कायम होता...गजबजलेल्या शहरातून त्यांची गाडी पुढे जात होती तशी प्रिया ऊंच ऊंच इमरती पहात मनातून उमलून जायची... थोड्या वेळात त्यांची गाडी शहराच्या गर्दीपासुन थोड दुर काही अंतरावर असलेल्या एका आलीशान बंगल्याजवळ येऊन थांबली...तसे एका वयस्कर माणुसाने त्यांच्या बंगल्याचे गेट उघडले. बंगला खुपच मोठा होता.. भव्य, आलीशान असे बंगल्याचे रुप न्याहाळती गाडीतून खाली उतरली... तोच बंगल्याच्या वरील एका खिडकीतून कोणीतरी पडदा किंचीतसा बाजुला करून किलकील्या नजरेने पहात असल्याच दिसल... त्यांच्या कडे पाहून थोडी हसली आणी अविनाश च्या मागे चालू लागली...
अविनाश न दरवाजा चे लॉक उघडायला किल्ली काढली तशी प्रिया दचकली... तीच्या मनात एक विचार चमकुन गेला... बाहेर तर कुलूप लावले आहे, मग आत खिडकीतून कोण पहात होत... पन त्याकडे दुर्लक्ष करत ती आत गेली... बंगला आतून खुप प्रशस्त होता.. जिन्याच्या पाय-या चढत अविनाश बोलू लागला...
" तु थकली असशील... फ्रेश हो, मी थोड बाहेर जाऊन येतो.... मग जेवायला बाहेरच जाऊ..." तीला बेडरूम दाखवून अविनाश बाहेर पडला... साहित्य तसच ठेऊन ती बेडवर तशीच आडवी झाली... प्रवासाचा खुप थकवा आला होता... डोळ बंद करताच थोडी दचकुन उठली... आणि पुन्हा तोच विचार पुन्हा मनात आला... 'कोण होत उभ त्या खिडकीत'.
आपली मान वळवून डावीकडे पाहील तर खिडकीवर लावलेला पडदा हल्क्या हवेने बाजुला व्हायचा आणि त्यातून बाहेर कोसळणा-या पावसा सोबत वा-याने झोके घेणारी बागेतील नारळीची झाडे दिसलीत... तशी ती उठली आणि समोरच्या त्या खिडकी जवळ जात पडदा बाजुला केला .
खिडकीवरील काचेचा दरवाजा किंचीत उघडून बाहेर पाहू लागली... दुरवर रस्त्याच्या दुतर्फा खांबावरील दिवे, त्यांच्या प्रकाशात बरसणा-या पावसाच्या धारा दिसत होत्या...
वा-याच्या झोक्याबरोबरच पावसाचे थेंब आत शीरताच तीने खिडकी बंद केली आणि मागे फिरली आणि दचकुन जागेवरच उभी राहीली... मनात तोच वीचार आला आणि मागे पाहिल ही तीच खिडकी होती जिच्या मधून तीला मघाशी कोणतरी पहात असल्याच दिसल... तशीच ती पुन्हा त्या खिडकी जवळ गेली आणि खाली पाहू लागली... तोच तीला बंगल्याच्या डाव्या बाजुला अंधुक उजेडात एक छोट नारळाच झाड दीसल.. त्या खाली कसली तरी हलचाल जाणवत होती.. प्रिया थोड निरखुन पाहू लागली तशी त्या झाडाखाली कोणीतरी आहे आणि ते एका हाताने झाडाला धरून गोल गोल फिरत असल्याच दिसल... तीला थोड विचित्र वाटल म्हणून ती हे पहाण्यासाठी आपल्या रुम मधून खाली आली. बाहेर येत तीन वाचमन ला हाक दिली...
"अहो.... काका.... "
बंगल्याच्या आवारात वाचमन ला रहाण्यासाठी बांधुन दिलेल्या छोट्या घरातून हातात छत्री आणि टॉर्च घेऊन ते धावतच आले...
" बोला मालकीन बाई..."
तशी प्रिया म्हणाली..
" त्या नारळीच्या झाडाखाली कोणीतरी आहे... जरा बघाल का....?"
तसे ते आपल्या हातातली टॉर्चचा प्रकाश पाडत पाहू लागले... प्रिया बंगल्याच्या पायरी वरच उभी राहून पहात होती... वाचमन ने सगळीकडे पाहील पन काहीच दिसल नाही...
ती तशीच आत आली आणि आपल्या रूम मधे गेली.. बाहेर जेवायला जायच होत त्यामुळे शॉवर घेतला आणि तयार होऊन अविनाशची वाट पहात बसली... तीला वाचनाची आवड असल्याने सोबत आणलेली काही गोष्टीची पुस्तकें काढून त्यातल एक वाचत ती बेडवर आडवी झाली... आपले पाय बेडवरून खाली सोडून तीच वाचन सुरू होत... पन वाचता वाचता कधी झोप लागली तील समजलच नाही... इतक्यात आपल्या पायाच्या तळव्यावर कोणाचातरी हल्का स्पर्श होत असल्यासारख वाटू लागल... तीला हल्की जाग आली पन डोळ्यावर झापड होतीच... पुन्हा ती तशीच झोपु लागली तोच कोणीतरी आपल बोट पायाच्या तळव्यावर हळुच ओढल तशी ती एकदम जागी झाली... झटकन आपले पाय वर घेऊन उठून बसली...
. वर घड्याळात पाहील तर दीड वाजलेला... कसला तरी भास झाला असेल अशी मनाची समजुत काढली... अविनाश अजुनही आला नव्हता... दिवसभर पोटात अन्नाचा कण नव्हता त्यामुळे तीला भुकही लागली होती... अविनाश ला फोन केला पन तो फोन उचलत नव्हता, शेवटी आईन बांधुन दिलेली भाजी भाकरी खाऊन घोटभर पाणी प्यायली आणि पुस्तक घेऊन पुन्हा वाचत बसली तोच अविनाश च्या गाडीचा आवाज आला.. तीन खिडकीतून पाहिल तर अविनाश सोबत आणखी एक माणुस होता... प्रियान आपले केस नीट केले आणि एका हातात मोबाइल घेत दुस-या हाताने आपला पदर सावरत खाली आली... ती खाली येई पर्यन्त दोन वेळ बेल वाजली होती... गडबडीत तीने दरवाजा उघडला तसा पडत झडत अविनाश आत आला.. तो खुप प्यायला होता... तो पडणार तोच प्रियाने त्याला सावरले... ती काही विचारणार तेवढ्यात सोबत आलेली व्यक्ति म्हणाली...
" मालकीनबाई ... मी तुमचा ड्राइवर 'बबन'.. त्यांना अशा अवस्थेत गाडी चालवता येणार नव्हती त्यामुळे साहेबानीच मला फोन करून बोलवुन घेतल होत..."
एवढ बोलून ड्राइवर ने तीच्या हातात गाडीची चावी दिली..आणि निघुन गेला..

हातातील मोबाइल सोफ्यावर ठेऊन अविनाश ला पकडुन ती आपल्या बेडरूम मधे नेऊन बेडवर बसवले पन तो तीथच आडवा होत झोपी गेला...त्यान दारू पिलेली पाहून प्रियाला भयंकर संताप आला..... तीला झोप येत नव्हती म्हणून पुन्हा ते पुस्तक वाचत बेडवरच बसली... वाचता वाचता तीला झोप लागते न लागते तोच परत तीच्या पायाच्या तळव्यावरून बोट फिरवल्यासारख्या स्पर्शाने ती झटकन जागी झाली... आणि आपले पाय जवळ ओढून आजुबाजुला पाहू लागली.. या घरात आल्यापासुन तीला हा एकच भास होत होता. कदाचित आपल्या बेडखाली कोणीतरी लपुन बसले असेल या जाणीवेने ती आणखी घाबरली... थोडा वेळ तशीच बसुन काही चाहुल येते का पाहील पन सर्व काही शांत होत... मग तीन स्वता: बेडखाली काही आहे का हे पहाण्याच ठरवल पन खाली उतरण्याचा धाडस होत नव्हत म्हणून ... आपले केस वर बांधुन बोडवर पालथी झाली, खाली पाहण्यासाठी हळू हळू पुढे सरकू लागली तसे तीच्या काळजाचे ठोके वाढत होते... तीची नजर बेडखाली फिरत होती, खाली काहीच नव्हते पन दुस-या क्षणात लाईट्स गेल्या तशी ती घाबरली आणि कोणतीही हलचाल न करता बेडवर शांत पडून राहीली... दुरवरून किंचीतसा प्रकाश खिडकी मधुन येत होता... टॉर्च लावण्यासाठी मोबाइल शोधू लागली तस लक्षात आल की मघाशी अविनाश ला वर आणताना मोबाइल खाली हॉल मधेच राहीला... तशी हतबल होऊन ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली... काही वेळ एक निरव शांतता होती पन ती जास्त वेळ राहीली नाही... आपल्या रूम मधे कसला तरी आवाज येत असल्याच प्रियाला जाणवल... श्वास रोखुन प्रिया तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली.. कोणीतरी आपल्या रुम मधील फर्शीवर कन्हत कन्हत आपल डोक आपटत असल्यासारख वाटू लागल... प्रियाला हे थोड विचित्रच वाटु लागल ... तोच कोणीतरी रांगत,सरपटत फिरत असल्याच जाणवू लागल... ही चाहुल तीच्या बेड खालुनच येत होती... अगदी तीच्या जवळ.. या आवाजान तीच्या काळजाच पाणी झाली... भीतीने तीला घाम फुटला होत...
तीच्या रूम मधे भयान काळोखात, निरव शांततेत कोणीतरी असह्य वेदनेने कन्हत रांगत, सरपटत फिरत होत, ही विचीत्र चाहूल तीला प्रत्येक क्षणाला जाणवत होती... आणि ते काय असेल या विचाराने भयभीत होऊन तीचा प्राण कंठाशी आला. तीने आपले डोळे गच्च मीटून घेतले आणि अविनाशचा हात घट्ट पकडून थरथर कापू लागली... हवेत गारवा असला तरीही भीतीने तीला घाम फुटला होता... इतक्यात तीला जाणवल की कोणीतरी आपल्या बेडवर चढण्याचा प्रयत्न करतय... आता मात्र हे तिच्या सहणशक्ति पलीकडच होत... भीतीने काळजाचे वाढणारे ठोके तीला स्पष्ट ऐकु येत होते... जोरात ओरडाव अस वाटल पन दुस-याच क्षणाला आपल्या एका हातानी आपल तोंड दाबुन धरल पन भीतीने तीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागल... प्रिया आता भीतीने थरथर कापत होती... थोड धाडस करून तीन आपले डोळे किंचीत उघडून पाहू लागली तस खिडकीतून आत येणा-या थोड्या प्रकाशात तीला आपल्या बेडवर एक बुटकी, काळी आकृति दिसली आपल्या लालसर किलकील्या नजरेने ती आकृति एकटक प्रिया कडे पहात होती... ते भीषण द्रुष्य पाहून तीच्या अंगावर सर्रर्रर्रर्रर सर्रर्रर्रर्रर्र काटा येऊ लागला... आणि दुस-याच क्षणाला त्या आकृतिच्या मागुन आणखी एक पांढरट आकृति सरकत बाजुला झाली...आता मात्र तीची सहनशक्तिच संपली.... आपल्या दोन्ही मुठी करकचुन आवळुन ती जोराने किंचाळणार तोच लाइट्स आल्या आणि त्या भयानक आकृत्या कुठेतरी नाहीशा झाल्या.. मघापासुन सुरू असलेला थरार, तो विचित्र आवाज सर्व काही शांत झाल होत...
घड्याळात पाहील तर रात्रीचे ३ वाजुन गेलेले... प्रियंका अजुनही थरथरत होती... भयभीत नजरेने ती आजुबाजूला पहात होती इतक्यात तीची नजर बेडरूमच्या दरवाजा वर गेली... दरवाजाच्या खालच्या फटीतून पलकडे कोणीतरी उभ आहे आणि हळू हळू दूर चालत जात असल्याच जाणवल... मघापासून सुरु असलेला भयानक खेळ थांबला असला तरी प्रिया च काळीज अजुनही जोरजोरात धडधडत होत... ही रात्र कधी संपेल अस तीला वाटत होत... पहाटे कधी झोप लागली समजलच नाही...

*****
तीला सकाळी जाग आली तेव्हा अविनाश आवरून office ला जाण्याची तयारी करत होता... रात्रि घडलेला प्रकार अविनाश ला सांगावा अस वाटल पन त्याच्या तापट स्वभावामुळे ती काही न बोलता उठली आणि फ्रेश व्हयला गेली... तेच बाहेरून अविनाश चा आवाज आला ..
" मला उशीर होतोय... मी निघतो.... बाहेरच जेवण करेन..."
एवढ बोलुन तो निघून गेला... फ्रेश होऊन तीन आपल्या आई ला फोन केला...फोन तीच्या बहीनीन उचलला...

" हैलो...ताई... कशी आहेस ग...."
" वैशु...आईकडे फोन दे..."
प्रियाचा आवाज खुप जड वाटत होता...
वैशालीने पन लगेच आईकड फोन दिला तस प्रियान रात्रि घडलेला भयंकर प्रकार आईला सांगितला... ती खुपच घाबरली होती... बोलता बोलता तीच्या अंगावर शहारा यायचा..
तीच बोलन ऐकून आई लागेच गावातील देवळात गेली... देवळातील पुजा-यान सार काही ऐकल आणि गंभीर मुद्रेन देवीच्या पायाला स्पर्श करून अंगा-याची पुडी आणि लाल धागा देत म्हणाले..
" पोरी... ज्या घरात तु मलगी दिलीस त्या घरावर मृत्युची काळी सावली दिसते ग... हे लवकरात लवकर तुझ्या पोरीला दे आणि सावध रहायला सांग... आता आईच तीच रक्षण करेल...."
प्रियाच्या वडीलाचा तीच्यावर खुप प्रेम... पुजा-यांच बोलण ऐकताच ते आपल्या मुलीची काळजी वाटु लागली.. त्यांनी तो धागा आणि अंगारा घेतला . क्षणाचाही विलंब न करता दोघे s.t. ने लेकीच्या घरी निघाले...

इकडे प्रियाला एवढ्या मोठ्या घरात कोंडल्यासारख होऊ लागल... पन आपले वडील येत आहेत हे समजताच तीला बर वाटल... बाहेर पावसाची उघडझाप चालुच होती... थोड्या वेळात धुण भांडी करणारी बाई आली तस तीला थोड बर वाटल.. काही जास्त न बोलता तीन आपल काम केल आणि निघुनही गेली... तशी पुन्हा तीला एकांताची भीती वाटू लागली... रात्रि घडलेल्या जागरणाने आता दिवसा तीच्या डोळ्यावर झोपड येत होती... हॉल मधील सोफ्यावर बसल्या बसल्याच तीला डोळा लागला... आणि पुन्हा तेच घडले पन या वेळ तीला आपल्या पायाजवळ तीच काळीकुट्ट बुटकी आकृति बसल्यासारख दिसल... त्या आकृतिने जोरात आपले नख तीच्या पायाच्या तळव्यावर ओढले तशी झटकन प्रिया न आपले पाय जवळ ओढून जागी झाली... पन कोणीच नव्हत... तेच स्वप्न तीला पुन्हा दिसले तशी अस्वस्थ झाली... इतक्यात दरवाजाची बेल वाजली... आपले आई बाबा आले असतील म्हणून ती घाई घाईत दरवाजा कडे धावली... आणि खरच तीचे आई बाबा आलेले... आईला बघताच तीला भरून आल... त्यांना घेऊन प्रिया आत आली तोच तीची आई म्हणाली...
" पीयु... फर्शीवर हे लाल डाग कसले ग..."
तसे तीने खाली पाहील तर खरच लाल रंगाचे पण एकाच पायाचे ठसे उठले होते... ते पाहून तीच्या काळजाचा थरकाप उडाला...
चेह-यावर एकदम भीती दाटली.. आणि थरथरत्या आवाजात ती म्हणाली...

" हे...हे.....हे....श....श.... शक्य नाही....
मी....मी......स्वप्न पाहील होत...."
मी....मी......स्वप्न पाहील होत...."
एवढ बोलुन ती खुर्चीवर बसली आणि पायाच्या तळव्याकडे पाहील तसे तीचे डोळेच पांढरे झाले... एखादी काच पायात घुसावी तसे पायात भेग पडली होती आणि एकसारख त्यातून रक्त वहात होत...
" अ....आई......म...म....मला...स् वप्न...."
तीच्या थरथरत्या ओठातून ऐवढेच शब्द निघाले आणी बेशुद्ध झाली..

काही वेळात ती जागी झाली तेव्हा ती आपल्या बेडवर होती... पायाला पट्टी बांधलेली तर आई वडील बाजुलाच बसलेले आणि अविनाश मोबाइल वर कोणाशीतरी बोलत होता... शुद्धवर येताच ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली... अविनाश काळजीने म्हणाला...
"कस झाल हे....स्वताला सांभाळून काम करायच ना..."
प्रियाच्या वडीलानी सोबत आणलेला देवीचा अंगारा आणी लाल धागा आपल्या लेकीला बांधू लागले तसा अविनाश रागातच म्हणाला...
"ते आधी काढुन टाका ..या घरात असल्या खुळचट गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाहीत.."

जावयाचे शब्द कानावर पडताच तीच्या वडिलाना भयंकर राग आला तरी स्वताला सावरत ते म्हणाले..
" जावई बापु.... तुमच्याकड सगळ काही आहे ... एक बायको मेली तर दुसरी मिळल..पन आपल्या मुलगीच काही बर वाईट झाल, तर रक्ताच पाणी करून फुलासारख मुलीला वाढवणा-या ह्या बापाच्या काळजाच काय होईल हे तुम्हाला नाही कळायच..."
सास-याच्या या उत्तरान अविनाश गप्पच झाला..
त्यांनी धागा बांधला आणि त्या दिवशी घरीच राहीले... दुस-या दिवशी प्रियाचे आई वडील मुलीचा आणि जावयाचा निरोप घेऊन परतले...

या घटनेला आता तीन चार महीने उलटून गेले असतील... दोघाचा संसार सुखात चालला होता... आता तीला कसलाच भास होत नव्हता आणि ती गरोदर होती...
गौरी- गणपतीच्या सणासाठी ती आता माहेरी आलेली... घरात सगळे आनंदी होते... पन ही एका भयान वादळा पुर्वीची शांतता होती...
गौरी गणपतीच्या सणात आपल्या मैत्रीणीसोबत चार दिवस घालवून ती आज सासरी निघाली.. आईने तीला ग्रामदेवतेच्या पायावर डोक ठेऊन आशीर्वाद घ्यायला सांगितल तशी प्रिया देवळात गेली... देवीच्या पाया पडली आणि देवळातील गुरवाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला तसे गुरव शांतपने म्हणाले..

" पोरी लग्ना नंतर ज्या विचित्र घटना तुझ्या आयुष्यात घडल्या त्या मी दिलेल्या धाग्याने बंद झाल्या नाहीत ... त्या घटना पुढे तुझ्या आयुष्यात येणा-या एका भयान वादळे सुचक होते..."
प्रिया थोडी घाबरली आणि साडीचा पदर सावरत हात जोडून त्यांच्या समोर बसली...
तसे आपले डोळे बंद करून मंत्र पुटपुटत गुरवानी खाडकन डोळे उघडले आणी म्हणाले..
" तुला अशा ताकतीचा सामना करायचा आहे जीला तीन्ही लोकातील कोणताच ईश्वर आजवर पराभुत करू शकला नाही , आणि पराभुत करूही शकत नाही, जगातला कोणताही मांत्रिक, तांत्रीक तुला मदत करून त्या शक्तिला संपवण्याइतपत सिद्ध नाही.. या युध्दासाठी नियतीन तुझीच निवड का केली हे त्या नियतीलाच माहीती... देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे...
आणखी एक गोष्ट ...मृत्युचा तांडव खुप आधी सुरू झालाय..."
प्रियाचा भयभीत चेहरा पाहुन गुरव पुन्हा आवाज चढवून मोठ्याने म्हणाले...
" पोरी घाबरू नकोस...तुझ्यात हिम्मत आहे .. निसर्गाचा नियम आहे, युद्ध त्यांच्यावरच लादली जातात ज्यांच्यात लढण्याची हिम्मत असते... स्त्री ही आदिशक्ती आहे आणि त्यामुळेच या युद्धासाठी एका स्त्री ची निवड झाली..."
प्रियाला गुरवानी सांगितलेल कोड उलगडल नव्हत पन येणा-या प्रसंगासाठी तीन आपल मन घट्ट करत पुन्हा मागे वळून देवळातील देवीच्या मुर्तीकडे पाहुन मनापासुन.आशीर्वाद मागीतला आणि सासरी निघाली...

त्या दोघाचा संसार छान चालला होता. अविनाशचा स्वभाव तापट होता पन ती समजु घेऊ लागली... काही दिवसातच ती गुरवानी सांगितलेल सार विसरून आपल्या संसारात रमली.. तीला चौथा महीना सुरू झाला आणि एरवी तापट स्वभावाचा अविनाश देखील आता तीची काळजी घेउ लागला...
एक दिवस ते प्रिया आणि तीच्या पोटातील बाळ सुखरूप आहे का याच चेकअप करून घरी परतले... प्रिया आनंदी असली तरी अविनाशचा चेहरा मात्र काळजीने व्यापला होता... तो प्रियाला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पन धाडस होत नव्हत... जेवण आवरून दोघे आपल्या बेडरुम मधे गेले... नवरा उदास आहे हे लक्षात येताच ती म्हणाली....
" काय झाल .... तुम्हाला बर वाटत नाहि का.."

म्हणत ती त्याच्या कपाळाला हात लावून पाहु लागली तसा अविनाशने तीचा हात आपल्या हाती घेत जड अंत:करणाने म्हणाला.
" पियु....आ....आय लव यु..."
त्याचे थरथरते शब्द ऐकताच प्रियाला थोडी काळजी वाटली..
"लव यु टू...पन काय झालं... इतके का अस्वस्थ आहात..."
"पियु.... तुला मन घट्ट कराव लागेल..."
" प्लिज... काय झाल सांगाल का..."
तसा अविनाश शांतपने सांगु लागला...
" डॉक्टरानी तुझ चेकअप करून मला आपल्या केबीन मधे बोलवल होत...त्यांनी सांगितल की आपल्या बाळाच्या ह्रदयात छिद्र आहे ... ते जन्मले तरी जास्त दिवस नाही जगणार..."
त्याचे शब्द कानावर पडताच प्रिया स्तब्ध झाली.. तीच्या डोळ्यातून अश्रु आले.. थरथरत्या आवाजात ती म्हणाली..
"हे.....हेे.....हे...खोट आहे ...माझ्या बाळाला काही झालेल नाही .. "

तीला सावरत अविनाशने जवळ घेत म्हणाला..
"Abortion हा एकच पर्याय डॉक्टरानी सांगितलाय...मी उद्या त्यांची वेळ घेतो..."

अविनाश कधीच झेपी गेला, पन तीची झोप उडाली होती.. ती ही झोपण्याचा प्रयत्न करत होती पन आपल्या मातृत्वाचे स्वप्न तुटलेले पाहून तीचे अश्रु अजुनही गालावरून ओघळत केसामधे विरून जायचे... आपल्या पोटावरू हात फिरवाना तीला आणखीनच भरून यायच... तसाच विचार करत ती झोपली पन डोळा लागतो न लागतो तोच तीच्या पायाच्या तळव्यावरून बोट ओढल्याचा भास झाला आणि झटक जागी झाली .. खुप दिवसानी हा भास झाला होता त्यामुळे थोडी घाबरली.. काही वेळ तशीच शांत बसुन राहीली तोच कसला तरी आवाज आला. ती शांतपने श्वास रोखुन ऐकू लागली तशी एक लहान मुलगी हूंदके देत रडत असल्याच जाणवल..
अविनाशला उठवायचा प्रयत्न करावा तर तो दिवसभराच्या कामाने कंटाळला होता... म्हणून ती स्वता:च उठून आवाजाचा वेध घेत बेडवरून खाली उतरली तोच प्रियंकाला खाली पाणी सांडल असल्याच जाणवल... तीला आश्चर्य वाटल ' पाणी इथ कोणी सांडल..' म्हणत ती चालू लागली.. आवाज बाथरूम मधून येत होता म्हणून तीन बाथरूम कडे पाहिल, आणि तीच्या काळजात चरर्रर्र कन झाल... दचकून ती जागेवरच उभी राहीली..
बाथरूममधून एक बुटकी आडीज, तीन फुट ऊंचीची काळीकुट्ट आकृति तीला वाकून पहात होती तीच्या चेह-याचा थोडाच भाग दीसत होता..केस लांब आणि पाण्याने भीजले होते. तीच्या भिजलेले केसामधून पाणी खाली फर्शीवर पडत होत.. प्रिया हळु हळु तीच्याकडे चालू लागली तशी ती आकृति आत सरकली... स्वताला सावरत प्रिया बाथरूम चा दरवाजा उघडीन आत मधे गेली तशी तीच्या भोवतीच वातावरणच बदलू लागल...बाथरूमच्या पांढ-या फर्शीवर झाडाचा पाला पाचोळा दीसू लागला... ती भयभीत नजरेने आजुबाजूला पाहू लागली तस काळोखात तीच्या भोवती नारळीची छोटीछोटी एकसरखी झाडे दीसु लागली.. तीथच मधे रीकाम्या जागेत एक खोल खड्डा खणला होती जो पावसाच्या पाण्याने पुर्ण भरला असल्याच
दीसू लागले.. या दृष्याने प्रिया थरारली, काही समजायच्या आत पुन्हा तीला कोणीतरी हूंदके देत रडत असल्याचा आवाज येऊ लागला... ती शांतपने तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली तस तीच्या लक्षात आल की तो आवाज त्या खड्या मधल्या पाण्यातून येत होता. तीची नजर खड्या मधील पाण्यावर गेले.... झाडाचा पाला पाचोळा पडून ते पाणी काळेकुट्ट दिसत होत.. ती सावध होऊन एकसारखी त्या पाण्यात पहात होती, इतक्यात
तीला कोणीतरी हाक दिली..
"आई.......मला वाचव ग..."
आणि दुस-याच क्षणात त्या खड्या मधून एका मुलगीचा हात बाहेर आला... तशी प्रिया थरारली, तीचा तोल गेला पन मगे भिंत असल्याने ती सावरली आणि समोरच ते भयान दृष्य धडधडत्या काळजाने पाहु लागली...त्या घाण पाण्यातून ती मुलगी रांगत बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली .... समोरच दृष्य पाहून प्रिया बंद करून खाली बसली.. तशी पाण्यातील गाळ आणी लाल चिखलाने माखलेली ती मुलगी रांगत, सरपटत ती उठून उभी राहिली... तीच्या केसामधे चिखल, पाणी खाली ओघळत होत... लाल रक्ताळलेल्या डोळ्यानी ती प्रिया कडे पहात म्हणाली...
" आई..."
आणि आपल्या हाताचे बोट डावीकडे दाखवत जोरात ओरडली.... तीच्या आवाजाने प्रियाच्या मेंदून झिणझीण्या आल्या. तसेच त्या मुलीने बोट केलेल्या ठिकाणी प्रिया पाहू लागली... तर समोरच एका नारळीच्या छोट्या झाडाखाली एक बाई आपल्या तीन, चार वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन झोपवण्यासाठी अंगाई म्हणत होती... प्रिया उठून चालत त्या बाईकडे जात तीच्या मांडीवर झोपलेल्या मुलीकडे पाहू लागली तस तीच्या लक्ष्यात आल की हीच ती मुलगी जी आता त्या खड्यातून बाहेर आली आणि चिखलाने बरबटली होती... थरथरत्या नजरेन प्रिया त्या बाई कड पाहील तशी तीची दातखिळीच बसली... तीला दिसल की आपणच त्या मुलीला मांडीवर घेतलय... या भयान दृष्याने ती जोराने किंचाळली.. तसा अविनाश धावत आत आला... ती थरथर कापत होती... तीला सावरत अविनाश आत घेऊन आली... तीच सगळ ऐकुन घेत अविनाश म्हणाला..
"तुला एखाद वाईट स्वप्न पडले असेल..."
पन ती अजूनही थरथर कापत होती..

दुस-या दिवशी दोघेही hospital मधे गेले... तीथ नेहमीचीच गर्दी.. दोघे नंबर वाट पहात बसलेले अविनाशचा मोबाइल वाजला, फोन वर बोलत तो बाहेर गेल तस प्रिया न आपला चेकअप केलेला रिपोर्ट पाहीला पन तीला तस काहीच problem दिसला नाही... तशीच ती डॉक्टराना भेटायला केबीन मधे गेली... डॉक्टरानी जे सांगितल ते ऐकून तीच्या पायाखालची जमीनच सरकली... आपला हूंदका आवरत ती तीथून बाहेर पडली ती अविनाशला न भेटताच घरी आली... आईला फोन करायचा प्रयत्न केला पन तीचा फोन लागत नव्हता... आपल्या रूम मधे बसुन हूंदके देत रडत होती... थोड्या वेळातच अविनाश घरी आला... त्याला पाहून ती खुपच चिडली...
"तुम्ही माझ्याशी खोट बोललात...इतका मोठा विश्वासघात....का.....? मला माहिती आहे पन मला तुमच्याकडून उत्तर हव आहे ..."
तीच बोलन ऐकून घेत अविनाश शांतपने म्हणाला....
" sorry ..मला माफ कर मी खोट बोललो तुझ्याशी... पन माझा नाईलाज होता... माझ्या आई वडिलांची हीच इच्छा होती.. पन त्या आधीच ते गेले. त्यांच्या अतृप्त आत्म्याला अजुन शांति नाही भेटलेली...माझ्यासाठी नाही पन त्यांच्यासाठी..."
अविनाशच बोलन ऐकुन ती संतापली...
" म्हणून मी माझ्या बाळाचा जीव घेऊ...नाही मी या बाळाला जन्म देणार..."

तीच बोलन मधेच थांबवतो तो म्हणाला...
" मग तुला माझ्याशी घटस्फोट घेऊन इथून कायमच जाव लागेल..."
एवढ बोलून अविनाश गाडी घेऊन office ला गेला पन त्याचे शब्द कानावर पडताच ती हादरून गेली...

******
त्या रात्रि अविनाश घरी उशीरा परतला पन तो खुप प्यायला होता... तो काही न बोलता तसाच झोपी गेला...प्रिया त्याच्या शेजारीच बसलेली... आज तीच्या पोटात अन्नाचा कणही पडला नव्हता... सगळ शांत, भकास वाटत होत... डोळे मिटून ती पडून राहीली.. बराच वेळ ती तशीच बसून होती. आपल्या विचारांमध्ये ती इतकी गुरफटून गेली होती की तीला कसलंच भान राहिल नव्हते.. तोच तीला कसलासा आवाज येत असल्याच जाणवल तशी ती साावध झाली.. आपले अश्रु स्वच्छ करून ती आवाज स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न करू लागली... कोणीतरी आपल्या रूमच्या बाहेर चालत असल्याचा भास झाला... तीन अविनाश ला उठवण्याचा प्रयत्न केला पन तो गाढ झोपेत होता... न रहावून ती उठली आणि हळुच दरवाजा उघडून बाहेर आली... बाहरचे लाइट्स बंद होते त्यामुळे तीला नीटस काही दिसत नव्हत..पन एक अस्पष्ट पांढरट आकृति पाय-या उतरुन खाली जात असल्याच जाणवल...तशी प्रियाही लाइट्स न लावता तीच्या मागे चालू लागली...इतक्यात चालताना तीचा धक्का लागून फ्लावरपॉट खाली पडला, प्रियान तो उचलुन वर ठेऊन समोर पाहील तर कोणीच नव्हत... भास झाला असेल म्हणून थोडा वेळ ती तशीच हॉल मधील सोफ्यावर डोळ बंद करून बसली, तोच तीला पुन्हा एक वेगळाच आवाज येऊ लागला...
' खंन्...खंन्.....खंन्...' अशा आवाजाने ती सावध झाली आणि उठून त्याचा वेध घेत चालू लागली... दरवाजा उघडून बाहेर आली तसा आवाज वाढू लागला... आवाज त्यांच्याच बागेतील मागील बाजुने येत होता... ती हळू हळू पुढे निघाली...इतक्यात तीला दीसु लागले की बागेतील एका अंधा-या जागेवर तीच पांढरट आकृति उभी आहे, तीच्या हाती असलेल्या हत्यारान ती जमीन खोदण्याचा प्रयत्न करतेय... प्रियाला थोडी भीती वाटली पन ते कोण आहे हे पहाण्यासाठी ती आणखी पुढे निघाली... पुढे जाता जाता ती आकृति थोडी स्पष्ट होऊ लागली...
प्रियाला दिसू लागल की पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक बाई हाती कुदळ घेऊन नारळीच्या झाडाखालची जमीन खोदण्याचा प्रयत्न करतेय... तीच्या लांबसडक केसानी तीचा चेहरा पुर्ण झाकला गेलाय... जमीनीवर प्रहार करताच तीच्या बांगड्या फुटून खाली पडायच्या...तीच्याकडे पाहून तीच्या अंगावर सर्रर्रर्रर्रर्र कन काटा आला... प्रियाची चाहूल लागताच त्या स्त्री ने जोरात हातातली कुदळ जमीनीत घुसवली आणि खाली वाकून आपली मान तीरकी करत प्रियाकडे पाहु लागली...तिच्याकडे पहताच भीतीने प्रियाचे डोळे पांढरे झाले... खाली वाकल्याने तीचे मोकळे केस तोंडावर आले होते, तीचे पांढरे कपाळ आणि डोळयांच्या रिकाम्या काळ्याकुट्ट खोबण्या पहाताच प्रिया जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली पन तीच्या तोंडातून फक्त हवाच बाहेर येत होती... तीला ओरडताही येत नव्हत... ती स्त्री हातातली कुदळ सोडून सरळ उभी राहात वर तीच्या बंगल्याच्या त्या खिडकीकडे पाहु लागली.. तस प्रियाने ही वर पाहिल आणि तीच्या काळजाचा थरकाप उडाला...कारण तीच्या समोर उभी तशीच स्त्री, वरून तीच्या बेडरूमच्या खिडकीतून रखरखत्या नजरेने पहात होती... काय चाललय हे समजण्या पलीकडच होत...प्रिया लक्ष पुन्हा समोर उभ्या त्या बाईकडे गेले तसा तीचा अर्धा केसामधून उघडा चेहरा क्रुर आणी विद्रुप होत असल्यासारख वाटू लागल , अचानक तीचा आवाज घोगरा झाला. आपल्या डोळ्याच्या रीकाम्या खोबण्या आणखी मोठ्या करत ती प्रियाकडे पाहू लागली... तसा प्रियाचा प्राण कंठाशी आला... भीतीन तीचे पाय जमीनीत रूतून बसल्यासारखी ती स्तब्ध होऊन पहात होती.. हळु हळू समोर उभ्या त्या स्त्री ने आपल्या हाताचे बोट पुढे करून खुणावले.. तस प्रिया ने ही आपल्या मागे पाहील आणी भीतीने आपल काळीज छाती फोडून बाहेर आल्यासारखे धडधडू लागले... कारण तीच्या पाठीमागुन काहीच अंतरावरून एक काळीकुट्ट बुटकी आक्रती ओरडत वेगाने धावत तीच्या दिशेने येत होती. त्या भयान घोग-या आवाजाने प्रिया च डोक बधीर होऊ लागल... भयभीत नजरेने ती धावत येणा-या आकृतिकडे पहात होती...घोग-या आवाजात धावत त्या आकृतिने त्या नारळीच्या छोट्या झाडात झेप घेतली आणि अद्भुष्य झाली, तशी ती समोर उभी स्त्री हातात कुदळ घेऊन जोरजोरात रडत, ओरडत किचाळत त्या झाडाखालील जमीन खोदू लागली... समोर घडलेले हे भीषण द्रूष्य पाहून तीला भोवळ आली आणी ती तीथेच बेशुध्द झाली...

प्रिया शुध्दीवर आली तसा अविनाश तीच्या जवळ बसलेला आणि बाजुला उभा वयस्कर वाचमन काहीतरी बोलत होता...
" सायब... वर्षभरापुर्वी तुमचे आई वडील त्याच जागेवर hartattac न मरण पावले . तुमचा आधीचा वाचमन देखील त्याच जागेवर मरुन पडलेला दिसला..."

तसा डोळ्यावरचा चष्मा काढतात अविनाश वैतागून म्हणाला...
" काय म्हणायच आहे तुम्हाला..."
तसा वाचमन हात जोडून बोलू लागला...
"रागवू नका सायब.. पण मलाही वाईट अनुभव येत आहेत ... कोणीतरी पायावर बोट फिरवून गेल्यासारख, कोणीतरी रांगत, सरपटत फिरतय आहे असा भास होतोय... "
प्रिया शांतपने त्यांच बोलन ऐकत होती.. वाचमन तीथुन गेला तसे तीने डोळे उघडले आणि आता आपन ठीक आहोत म्हणत अविनाश ला office ला जायला सांगितले... तो ही office ला निघुन गेला... वाचमनच्या बोलणायाचा विचार करत ती उठली आणि बाहेर आली... वाचमन बंगल्याच्या आवारातली स्वच्छता करत बसलेला... त्याच्या जवळ जात ती म्हणाली.
"काका... कधीपसुन तुम्हाला हे विचित्र भास होत आहेत..."
तसा तो म्हणाला..
"मालकीनबाई तुमच लग्न व्हायच्या वर्ष भर आधी मी रहायला आलो.. तेव्हा पासुन कधीतरी हे भास होतात..."
प्रिया पुन्हा प्रश्न विचारला...
"आणि अविनाश चे आईवडील कसे वारले.." म्हणत ती बंगल्याच्या पायरीवर बसली...

तसे ते म्हणाले...
" ते नारळीच छोट झाड अपशकुन आहे ... सगळ्यात आधी तुमच्या सासुबाई वारल्या त्या झाडाखाली त्या मरून पडलेल्या दिसल्या...डॉक्टरानी तपासुन सांगितल की त्यांना hartattac आला होता. त्या कशाला तरी खुप घाबरल्या होत्या त्यांच्या ह्रदयाच्या शीरा आतून फुटून रक्तस्त्राव झालेला..."

प्रिया शांतपने ऐकत होती...
खाली जमीनिवर बसत वाचमन पुढे म्हणाला..
खाली जमीनिवर बसत वाचमन पुढे म्हणाला..
" कोणीतरी सांगितल की हे पिशाच्याच काम आहे पन साहेबानी विश्वास ठेवला नाही ... आणि त्याचा आधीचा वाचमन ही अगदी तसाच मेला...."
त्याच बोलन ऐकत प्रिया मनात म्हणाली 'इतकी भयंकर घटना इथ घडली आणि मला कोणीच सांगितल नाही..'
आपल्या डोक्यावर बांधलेल्या कापडाने तोंड पुसत वाचमन पुढ म्हणाला...
" मालकीनबाई तुमच्या सास-यानी मोठा पुजारी आणला... खुप मोठा यज्ञ घातला त्याने... लाखाच्या वर पैसै नेले ... खुप मांत्रीक,तांत्रीक केले... सर्व काही केले त्या मांत्रीक लोकानी पन खुप बुडवले याना... प्रत्येक जन येऊण म्हणायचा... माझ्या तकतीने तो आत्मा नष्ट केला ..निश्चिंत रहा ... आणि काही दिवसातच साहेबांचे वडील ही अशाच एका भयानक मरणाने गेले.."
प्रिया आश्चर्यान त्याला विचारल...
" काका इतक्या भयानक गोष्टी घडल्या हे ऐकल असताना तरी तुम्ही इथ काम करायला तयार कसे झालात.."

त्यावर तो हसुन म्हणाला ...
" पोरी तु माझ्या लेकीसारखी ग... एकच मुलगा मला.. लगीन केल... त्यांना माझी आडचन व्हायला लागली... म्हणून त्यांनी बाहेर काढायच्या आत कुठेतरी चार घासासाठी काम करून जीव जगवायचा... कसलीच भीती नाही बघ..."
त्यांच बोलन ऐकून प्रिया शांतपने आत गेली. तीला गावच्या गुरवानी सांगितलेले शब्द आठवले...

" तुला अशा ताकतीचा सामना करायचा आहे जीला तीन्ही लोकातील कोणताच ईश्वर आजवर पराभुत करू शकला नाही आणि पराभुत करूही शकत नाही, जगातला कोणताही मांत्रिक, तांत्रीक तुला मदत करून त्या शक्तिला संपवण्याइतपत सिद्ध नाही.. देवीचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे... "
काही वेळात वाचमन आत येऊन म्हणाला..
" मालकीन बाई... माझी नात लय आजारी हाय...तीला बघायला जाव लागल.."

प्रिया काही पैसे देणार तोच वाचमन म्हणाला... "पैसे आहेत मालकीनबाई...लागले तर सांगेन.."
त्याच्याकडे पहात प्रिया शंभर रुपयाची नोट देत म्हणाली...
" हे घ्या .. माझ्याकडून तीला खाऊ घेऊन द्या..."

वाचमन निघुन गेला तशी प्रिया पुन्हा आपल्या विचारात गुरफटली..
रहस्याचा उलगडा करण्यासाठी प्रिया अविनाशची वाट पहात बसलेली...
अविनाश नेहमीप्रमाने पिऊन रात्रि उशीरा आला... तशी प्रिया त्याला या घटना बद्दल विचारू लागली... पन पुन्हा abortion न करण्यावरून दोघामधे खुप मोठ भांडन झालं... अविनाशच्या डोळ्यात क्रौर्य दाटल होत, त्याने प्रिया वर हात उचलला पन प्रिया काहीच ऐकण्याच्या मनस्थितीन नव्हती... तीन स्पष्टच सांगतल...
" वाट्टेल ते झाल तरी मी या मुलीला जन्म देणारच..."
तीच बोलन ऐकून अविनाशच्या तळपायाची आग मस्तकात शिरली... तीला फरफटत एका अडगळीच्या खोलीत कोंडून घालत म्हणाला..

एवढ बोलून तो आपल्या रुम मधे येऊन दारू पित बसला...एका मागुन एक पेग पोटात ढकलत होता आणी संतापाने प्रियाला शिव्या ही हासडत होता... आता नशेन नजर अंधुक होत चालली, तोच त्याला एक पांढरी आकृति त्याच्यापासुन काही अंतरावर उभी दिसली... दारेच्या नशेतच जड जीभेने अडखळत तो बोलु म्हणाला...
" प्रिया तु परत इथ कशी आलीस.... तु तशी ऐकणार नाहीस..."
त्याने कमरेचा बेल्ट काढत उठला तशी ती आकृति चालू लागली...तसेच बडबडत अविनाश ने तीच्या मागे चालायला सुरवात केली...ती आकृति तशीच जिन्यावरुन उतरून खाली निघाली तसा अविनाशही पडत धडपडत तीला शिवीगाळ करत चालू लागला..

इकडे... अडगळीच्या खोलीत बंद प्रिया, तशीच त्या रुमचे दार बडवून तीथुन बाहेर काढण्यासाठी अविनाशला विणवनी करत होती...शेवटी थकुन रडत त्या खोलीत बसली होती...तीची नजर त्या खोलीला न्याहाळू लागली.. बाजूला एक जुने लागडी कपाट, एक टेबलवरील पंखा, मोडलेल्या खुर्च्या, टेबल, एक खराब सोफा.. तीन थोड निरखुन पाहिल तर त्या सोफ्या खाली एक छोटी बाहुली पडलेली दिसली... त्या बाहुली वर लालसर डाग दिसले. तीन पाहील तर ते कोणाच तरी सूकलेल रक्त होत... प्रियाला थोड आश्चर्य वाटल तशी ती त्या खोलीची झडती घेऊ लागली...
तोच त्या लाकडी कपाटाखाली तीला एक वही पडली असल्यासारखी वाटली..तीचा हात खाली जात नव्हता तसा तीन लाकडी खुर्चीचा पाय तुटलेला भाग उपसुन काढला आणि ती वही बाहेर काढली...ती कोणाचीतरी डायरी होती...

प्रिया न डायरी झाडली तसा एक फोटो खाली पडला त्यात एक खुपच देखणी स्त्री आणि एक छोटी मुलगी होती...
डायरीची पाने पलटत प्रिया वाचू लागली..
डायरीची पाने पलटत प्रिया वाचू लागली..
'आज अविनाश खुप आनंदी होते... मला दिवस गेलेत हे समजताच म्हणाले..की " 'अश्विनी'...मुलगाच हवा मला.. " मी त्यांच बोलन मनावर घेतल नाही ... ते माझी काळजी घेऊ लागलेत...'
..
प्रियाला वाचुन धक्काच बसला...
' अविनाशच आधी लग्न झालेल..' भरल्या डोळ्याने ती पाने पलटत वाचु लागली तसे एक एक गुढ उकलू लागले...
..
.
' मला आज खुप वाईट वाटल.. माझ्या बाळाच्या ह्रदयाला छिद्र आहे म्हणून रिपोर्ट आलाय, अस अविनाशने सांगितल..'
.
..
.
'ते माझ्याशी खोट बोलले.. माझ बाळ व्यावस्थीत आहे पन मुलगी आहे म्हणून अविनाश आणि त्याच्या घरच्याना ते नको झालय...पन मी तीला जन्म देणारच'
.
.
.
त्यांनी मला घराबाहेर काढली..

प्रिया एक एक पान पलटत होती तस एक एक गुढ उकलत होत.
.
'माझ पहले बाळंतपन माहेरी झाले...पन माझ्या माहेरचे सर्वच खुप उदास आहेत .. मुलगी झाली म्हणून नाही तर मला सासरच्यानी घरातून बाहेर काढली म्हणून..'
.
.
'इस्टेटीत वाटणी द्यावी लागेल म्हणून सासरच्यानी मला आणि माझ्या लेकीला पुन्हा घरात घेतली..पन कोणी माझ्याशी बोलत नाही.'
.
.
'सासरच्यानी तीच नाव 'नकुशा' ठेवलय कारण ती यांना नकोशी झाली आहे '
.
.
'घरातील नोकराना काढून टाकलय मलाच सर्व कामे करावी लागतात... आज माझी मुलगी भुकेने व्याकुळ होऊन रडत होती, पन त्यानी मला तीला दुधही पाजु दिल नाही '...
.
. ' आज नकुशाचा पहीला वाढदिवस, पन साजरा करण खुप लांबची गोष्ट ..तीला तीच्या बाबाने किंवा आजी आजोबाने साध wish ही केल नाही ....'

प्रिया तशीच पान पलटत राहीली.
' आज माझ्या मुलीच्या तोंडतून पहिला शब्द बाहेर पडला आणि तो ही 'बाबा'...'

' माझी मुलगी तीन वर्षाची झाली आणी मला पुन्हा दिवस गेलेत..."
.
.
' आज अविनाशन दुपारी नकुशाला खुप मारल.. ते घरी बेडवर आराम करत होते.. आणि नकुशान गमतीन पायाच्या तळव्यावर बोट फिरवून पळून गेली...त्याना खूप राग आला... रागाच्या भरात त्यानी माझ्या पोरीला जनावरासारख मारल. माझ बाळ,रडत रडत माझ्या मांडीवरच झेपल.. '
.
"आज तीचा तीसरा वाढदिवस पन तीची तब्बेत बरी नाही... तीच अंग कालपासुन तापाने भाजतय.. पन कोणालाच तीची पर्वा नाही ... बाहेर जोराचा पाऊस पडतोय... डॉक्टरांचा फोन लागत नाही...तापाने ती झोपेत जाबडत आपल्या बाबांचीच आठवण काढतेय, तीच्या डोळ्यातून अश्रु येत आहेत.."

वाचता वाचता प्रियाचेही डोळे पाणावले...
" आज तीन दिवस नकूशाच्या अंगात ताप आहे.. अविनाश घरी येताच त्याला बोलले पन मी abortion साठी नकार दिल्याने त्याने मला चमड्याच्या बेल्टने खुप मारले... त्या आवाजाने नकुशा जागी झाली आणि रडतच माझ्या आडवी आली, आणी त्याच्या समोर हात जोडून उभी राहात म्हणाली.. ' बाबा.. आईला मालू नका हो.."..पन त्याने तीला जोरात धक्का दीला तशी ती बेडच्या
कोप-यावर आपटली तीच्या डोक्यावर खोल जखम झाली.... खुप रक्त येत होत... ती तशीच उठली आणि आपल्या आजी आजोबांना बोलवण्यासाठी धावत बाहेर गेली पन तीचा पाय घसरला आणी जीन्याच्या पाय-यावरुन खाली पडली... तीचे आजी आजोबा समोर होते पण कोणीच तीला उचलल नाही....तीचा हात फ्रॉक्चर झालाय...."

प्रियाला त्या पानावर अश्रुचे सुकलेले व्रण दिसले...तीने ते पान पलटले
" नकुशाच्या डोळ्यातून एकसारख पाणी येतय..तीच अंग तापान भाजतय.. डोक्यातही खोल जखम झालीये. त्यावर साडीचा पदर फाडून बांधलाय... पन तीच्या मोडलेल्या हाताला खुप वेदना होत आहेत... ती माझ्या मांडीवर डोक ठेऊन हूंदके देतेय. पन कस सांगु तीला की तीच्या वेदना पाहून माझ काळीज फाटत होत.... माझ्या डोळ्यातली पाणी बघताच रडत रडत आपल्या बोबड्या शब्दात मला म्हणाली...
'आई तू कशाला ललतेस ग..' एवढ बोलून नकुशा उठली आणि माझ्या पाठवर उठलेले वळ पहात त्यावरून आपला एक हात फिरवत म्हणाली
' आई तुला पन खुप दुखतय का ग.' तीच्या बोबड्या शब्दाने काळीज आणखीनच तुटतय. काय करू देवा...'

वाचता वाचता प्रियाच्या डोळ्यातून अश्रु आले.. तीने आणखी एक पान पलटले..
' मी आज नाईलाजान abortion करायला गेले होते... करण त्या बदल्यात ते माझ्या मुलीला डॉक्टरकडे घेऊन जाणार म्हणालेत...घरी यायला रात्र झाली ... पन घरी परत असताना बागेच्या आवारात एक मोठा खड्डा खणलेला दिसला..'

मला पुन्हा त्या अडगळीच्या खोलीत ठेवल.. आत गेले तसे वेदनेन 'आई...ग आई..ग' म्हणत कळवळणा-या नकुशाचा आवाज आला... मला पहाताच तीला आणखीच हूंदका आला... ती खाली रडत बसलेली... आपला मोडलेला हात किंचीत पुढे करत केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात म्हणाली.
"आई ...खुप दुखतय ग..."
तीचे पाणावलेले डोळे पाहून गहीवरून आल..तीला जवळ घेत मी पाहील तर तीचा हात सुजून काळा निळा पडू लागला होता... तीन वर्षाच्या माझ्या मुलीच्या इवल्याश्या जीवाला किती ह्या यातना... आज पहील्यांदा वाटल की का जन्म दिला असेल तीला...तीची अवस्था पाहून हूंदका आवर कठिन झाल होत... मी मदती साठी जोरजोरात दरवाजा वाजवून अविनाशला बोलवू लागले... तो गाढ झोपेतून उठून आला...खुप राग आला होता त्याला... मी त्याच्या पायावर डोक ठेऊन नकुशाला दवाखान्यात नेण्यासाठी विणवनी करु लागले.. पन त्याने मला पुन्हा बेदम मारला.. माझ ओरडन बंद करण्यासाठी माझे हात पाय बांधुन तोंडावर पट्टी बांधली, माझ ओरडन शांत झाल तसा तो नकुशाकडे वळला...'

प्रियाने आपल्या डोळ्यात आलेले अश्रु स्वच्छ करत पान उलटले... हे पान सुकलेल्या अश्रुनी जड झाले होते... कदाचित आपल्या काळजातील एक एक शब्द जसा च्या तसा तीन उतरवला होता..
तो नकुशा जवळ गेला.. तशी माझी मुलगी त्याचा एक हात पकडून हूंदके देत त्याला म्हणाली...
"बाबा... ओ बाबा आईला शोला हो... मला डॉक्टल अंकल कले नका नेऊ पन आईला शोला... माझा हात आता बला झाला.. माझा हात आता नाही दुखत.....'
नकुशाच बोलन ऐकत तो खाली बसत म्हणाला...
'आता हात नाही दुखत'
अस म्हणत त्याने नकुशाचा मोडलेला हात आपल्या हातात घेत जोरात दाबला.. तशी माझी मुलगी जीवाच्या आकांताने कळवळली... ढसाढसा रडता रडता केविलवाण्या नजरेने आपल्या बाबाकडे पहात ती बोबड्या शब्दात म्हणाली...' बाबा ओ बाबा... तस कलू नका हो.. खुप दुखतय ... मी पलत कदी कदी तुम्हाला त्लाश देणाल नाही..." तीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रु तीच्या इवलाशा जीवाला होणा-या यातना सांगत होते..

प्रियाला हूंदका आवरण कठिन झाल आपले अश्रु पुसत ती पुन्हा वाचु लागली..
अविनाशने तीचा मोडलेला हात आणखी जोरात दाबला तसे नकुशाने विव्हळत भरलेल्या नजरेने माझ्याकडे पहात मला म्हणाली...' आई.... तु तली शांग की ग बाबाना...खुप दुखतोय ग माझा हात...'
तीच्या डोळ्यातल्या यातना पहावत नव्हत्या.. मी ही रडत होते माझे हातपाय बांधल्याने उठताही येत नव्हत.. माझ डोक मी जमीनीवर आपटत त्याच्या कडे नकुशाच्या जिवाची भीक मागत होते... पन कुणाच्याच काळजाला पाझर फुटत नव्हता... तशीच रांगत,सरपटत तीच्याकडे जाऊ लागले...
नकुशा अविनाशच्या गालावर आपला दुसरा हात प्रेमान फिरवत म्हणाली..
" बाबा... माझ काय चुकल हो.... मी पलत तुमच्या पायाला गुदगूल्या नाही कलनाल....."

तीच बोलन ऐकताच अविनाश म्हणाला..
" तुझ चुकल या घरात मुलगी म्हणून जन्माला आलीस हे... माझ्या आई बाबाना वंश चालवायला मुलगा हवा होता..."
एवढ बोलुन त्याने माझ्या नकुशाचा मोडलेला हात पकडून खसकन जवळ ओढली ... एखाद्या गाईच वासरू जिवाच्या आकांतान जोरात हंबरावे तशी नकुशा ओरडू लागली... तीचा टाहो ऐकुन काळीजच फाटल... तोच तीला खाली जमीनी वर पाडले... आपल्या दुस-या हाताने तीच नाक आणी तोंड दाबुन धरल .. ती टाचा घासत होती, तडफडत होती... तीच्या शरीराला होणा-या यातना पाहुन मी ही तडफडत होते.. माझी लेक गुदमरून टाचा घासत होती तस माझ्या काळीजाच्या चिंधड्या होऊ लागल्या... पन त्याला दया आली नाही.. मी सरपटत येऊ लागले पन तोवर तीचा धडपड शांत झाली.. इवलासा जीव तीच्या देहातून निघून गेला होता... मी तशीच नकुशाच्या निष्प्राण देहाकडे भरल्या डोळ्यांनी पहात होते... अविनाश निघून गेला... पन माझ्या लेकीच्या देहापुढ आपल डोक आपटत होते... तशीच सरपटत पुढ आले आणि तीच्या छातीवर डोक ठेऊन रडू लगले...
तीला आता वेदना होत नव्हत्या... तीचे डोळ उघडेच होते... अस वाटत होत की झटकन उठून धावत माझ्या कुशीत शिरेल... पन ती आता कधीच उठणार नव्हती...
खाली जमीनीवर पडलेल तीच प्रेत पाहाताना तीच तीचा एक एक शब्द आठवत होता...
" आई... आपल्या घलात कोणीच का माझ्याशी बोलत नाही... एक दिवश मी पन कोनाशीच बोलनाल नाही..."
ती आता कोणाशीच बोलणार नाही, अगदी तीच्यावर जिवापाड प्रेम करणा-या आईशी पन..
.
.
. माझे हात कसेबसे सोडवून मी ही डायरी लिहीतेय...तीच प्रेत माझ्या मांडीवरच आहे... माझ्या मुलीचा खुन त्यानी माझ्या समोर केलाय त्यामुळे ते मला जीवंत सोडणार नाहीत ... पन ही डायरी त्याला फासावर चढवेल..
या नंतरची सर्व पाने रिकामी होती...
अविनाशच हे भयंकर रूप प्रियंकासमोर आल तशी ती खुप चिडली... अचानक त्या डायरीच्या रिकाम्या पानावर काही शब्द उमटू लागले... प्रिया निरखुन पाहात वाचू लागली...
' माझाही गळा बेल्टने आवळून अविनाश ने मला ठार केल...घरच्या वाचमन आणि अविनाशने आम्हा दोघीच प्रेत बागेतील त्या खड्यात पुरून त्यावर नारळीच झाड लावल.. आमची शरीर संपली पन आत्मे या घरात तसेच फिरत आहेत... माझी नकुशा आता तुझ्या पोटी जन्म घेतेय. मी माझ्या लेकीसाठी खुप तळमळले... आता ती जन्म घेईल आणि माझा आत्मा मुक्त होईल... पन मी नेहमी तीच्या सोबत असेन तीला प्रत्येक संकटातून वाचवायला ....'
उमटलेले ते शब्द पुन्हा नाहीसे झाले... वाचता वाचता पहाटे तीला डोळा लागला..

कसल्याशा आवाजाने प्रियाला जाग आली... सकाळ झाली होती. बाहेर पोलीस होते.. त्यानी प्रियाला बाहेर आणून बसवत म्हणाले...
" माफ करा madam पन काही प्रश्न विचारावे लागतील.. तुम्ही त्याना ओळखु शकाल..."

ते काय बोलत आहेत तीला काही समजत नव्हत...तोच एक लेडी काँन्स्टेबल म्हणाली...
" madam..त्यांचे चेहरे झाकले होते का.."
प्रिया प्रत्येकाकडे आश्चर्याच्या मुद्रेने पाहात होती...काय बोलाव तीला सुचत नव्हत.. तोच ती लेडी काँन्स्टेबल सब इन्स्पेक्टर ना म्हणाली..
" सर त्या शॉक झाल्या आहेत ... ही केस खुपच काँम्प्लिकेटेड आहे मागिल दिड वर्षापुर्वी याच बंगल्यातील बाई आणि तीची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती... ती वेडी होती अशी कम्प्लेन्ट तिच्या सास-याने दिली होती त्या नंतर वर्षभरात याच बंगल्यात तीन खुन झालेत आणि हा चौथा....
तोच बाजुला उभा दुसरा काँन्स्टेबल साहेबांच्या कानापाशी जात हळुच म्हणाला..

" साहेब.. मला तर वाटते की हे खंडणी साठी झाल असाव.."
त्याच बोलन ऐकून इन्स्पेक्टर साहेब हळुच त्या काॅन्स्टेबलच्या कानात म्हणाले ....
" जी गोष्ट आपल्या जवळ नाही त्यावर ताण कशाला देत.."
त्यावर तो काँन्स्टेबल म्हणाला
" अगदी बरोबर बोलताय सर.. पन तुम्ही कशाबद्दल बोलताय...."
त्यावर त्याच्या थोड जवळ जात इन्स्पेक्टर म्हणाले..
" मी तुमच्या बुद्धि बाबात बोलतोय... कारण ..जर खंडणी साठीच खुन झालेत तर मग इथल्या जुन्या वाॅचमनला मारायची काय गरज होती..."

काय झालय हे प्रिया पहायला बाहेर गेली तर त्या नारळीच्या झाडाखाली अविनाशचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह पडला होता...
त्याच्या कडे पहाताच प्रिया गावच्या गुरवानी सांगितलेले कोडे उकलले...
'जगातला कोणताही मांत्रिक, तांत्रीक त्या शक्तिला संपवण्याइतपत सिद्ध नाही..'
करण आई इतके शक्तीशाली जगात कोणीच नाही...
प्रियाच्या चेह-यावर एक समाधान होत... एका राक्षसाचा अंत झाला, आणि तीच्या मुलीला आता जन्म घेण्यापासुन रोखणार कोणीच नव्हत...
तीचा जन्म विधीलीखीत होता..... जो कुण्या राक्षसाच्या मर्जीन थांबणारा नव्हता...

!!!......समाप्त.....!!!
Save the girl child
Save the girl child